शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारच्या महापौरांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:41 IST

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने केलेला बदल असल्याचे मत : उमेश नाईक यांच्या नावाची चर्चा

नालासोपारा : वसर्ई - विरार शहर महानगरपालिकेचे विद्यमान महापौर रूपेश जाधव यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आणि हितेंद्र ठाकूर यांनी तो लगेच स्वीकारल्याने वसई-विरारमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. महापौरांच्या राजीनाम्यानंतर उमेश नाईक या पक्षातील वरिष्ठ चेहऱ्याला महापौरपदी बसण्याची संधी देण्यात येऊ शकते, सध्या त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा आहे.पुढील वर्षी वसई-विरार शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असून महापौरपद हे राखीव वर्गासाठी असल्याने एका वर्षासाठी पक्षातील सर्वसाधारण वर्गातील एखाद्या ज्येष्ठ नेत्यास या पदावर बसण्याची संधी द्यावी, असा विचार करून महापौर पदाचा त्याग केल्याची भावना महापौर रूपेश जाधव यांनी व्यक्त केली आहे. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नालासोपाºयाच्या रणांगणात उतरविण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मने जपण्यासाठी तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांना खूश करून नालासोपाºयातील बहुजन विकास आघाडीच्या मतांची मोट बांधण्याच्या हालचाली आतापासूनच सुरू झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बविआचे बळीराम जाधव यांना नालासोपाºयातून सपाटून मार खावा लागला होता. नालासोपारा हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला असतानादेखील येथे शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांना तब्बल २६ हजार मतांची आघाडी मिळाली होती. महापौर जाधव यांच्या आचोळ्यातील प्रभागातूनही राजीव गावित यांना मतांची आघाडी मिळाल्याने हितेंद्र ठाकूर नाराज होते. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ही उमेदवारी प्रदीप शर्मा यांना देऊ केल्याचे समजते. उत्तर भारतीय मतांची मोट बांधण्यासाठी ही खेळी खेळण्यात आल्याचा अंदाज आहे. अशातच बहुजन विकास आघाडीतील नाराज कार्यकर्ते तसेच अंतर्गत दुफळी भरून काढण्यासाठी पक्षीय स्तरावर मोठे बदल करण्याच्या हालचाली बविआच्या गोटातून सुरू झाल्या आहेत. राजीनामा हा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने केलेला बदल असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. जाधव हे एकमेव महापौर आहेत ज्यांनी एवढे मोठे पद दुसऱ्यांसाठी सोडले आहे. त्यांच्या या त्यागामुळे ते कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत झाले, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

वसई विरार महापालिकेच्या महापौर पदाचा राजीनामा स्वत:हून दिला आहे. जानेवारी २०१८ मध्ये महापौर पद हे सर्वसाधारण वर्गासाठी खुले होते. परंतु हितेंद्र ठाकूर यांनी माझ्यासारख्या दलित वर्गातील तरूणाला या पदावर विराजमान होण्याची संधी दिली. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवाराला महापौर पद मिळावे यासाठी स्वत:हून हा राजीनामा दिला आहे. - रु पेश जाधव (माजी महापौर, वसई विरार महानगरपालिका)