शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पेपरफुटीच्या मास्टरमाइंडला नागपूर येथे अटक

By admin | Updated: November 7, 2015 22:19 IST

या जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक -टंकलेखक परिक्षेदरम्यान मोबाईलचा वापर करून आपल्या टोळीद्वारे इतर केंद्रातील परिक्षार्थींना उत्तरे पाठविण्याच्या गुन्ह्यातील मास्टरमार्इंड

पालघर : या जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक -टंकलेखक परिक्षेदरम्यान मोबाईलचा वापर करून आपल्या टोळीद्वारे इतर केंद्रातील परिक्षार्थींना उत्तरे पाठविण्याच्या गुन्ह्यातील मास्टरमार्इंड अमर विठ्ठलराव खंडाळकर (३६) रा. यवतमाळ यास स्थानिक गुन्हे शाखेने नागपुर येथून अटक केली आहे. त्यामुळे लवकरच या परिक्षा गैरव्यवहारातील टोळीचा बिमोड करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिम गुन्हे शाखेचे पो. नि. ऐ. व्हनमाने यांनी दिली.परिक्षेमधील गैरप्रकाराची मोठ्या व्याप्तीची शक्यता पाहता जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी परिक्षा रद्द करून पुन्हा १८ आॅक्टोबर रोजी परिक्षा प्रक्रिया नव्याने राबविली होती. या परीक्षेवेळी कुठलाही अनुचीत प्रकार घडणार नाही यासाठी प्रशासनाने सर्व पातळीवर दक्षता घेतली असतानाही तारापुर टॅप्स परिक्षा केंद्रात मोबाईल नेणाऱ्या संगिता नारायण सुराडकर (३०) रा. जालना व वसई केंद्रातील परिक्षार्थी अरूण शामराव गवळी या दोघांना पोलीसांनी अटक केली होती.सरळसेवा भरती प्रक्रियेत दोन वेळा गैरप्रकार झाल्याने या प्रकरणात मास्टरमार्इंड असल्याची माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. यावेळी या गुन्ह्यात मास्टरमार्इंड अमर खंडाळकर या फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास कवासे यांनी नागपुर येथे अटक केली. आरोपी खंडाळकर उच्चशिक्षित असून स्पर्धापरिक्षेचे क्लासेस चालवितो. त्याने पालघर येथे परिक्षा देताना स्वत:चे नावात चार वेळा बदल करून चार परिक्षाकेंद्राची निवड केली होती. ज्या परिक्षा केंद्रामध्ये मोठ्या बॅचेस असतील ज्या ठिकाणाहून मोबाईलचा खुबीने वापर करता येईल असे परिक्षा केंद्र निवडताना त्यांनी वसई तालुक्यातील एम. के. शेठ, गुजराती हायस्कूल माणीकपूर हे परिक्षा केंद्र निवडले. स्वत:चे पेपर अवघ्या अर्धा तासात सोडवून त्यातील उत्तराचे क्रमांक ५-५ च्या ग्रुपने मोबाईलद्वारे आपल्या टोळीतील बाहेरच्या साथीदाराना पाठवून त्यांच्या मार्फत परिक्षा केंद्रावरील गैरप्रकार करणाऱ्या परिक्षार्थींना पाठविण्यात आले होते. ]या प्रकरणात चार परिक्षार्थी सह मुख्य सुत्रधार असे पाच आरोपींना अटक करण्यात आले असून मोठे रॅकेट असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीचा बिमोड करण्यासाठी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरविली होती. (वार्ताहर)- पालघर जिल्हा कार्यालयातील महसूल विभागातील लिपीक -टंकलेखक सरळ सेवा भरती परिक्षा प्रथम ४ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली होती. त्यावेळी पालघरच्या आर्यन शाळा परिक्षाकेंद्रामध्ये मोबाइल नेऊन त्याद्वारे प्रश्न व उत्तरांची देवाणघेवाण करताना राजीव प्रकाश झडके रा. उमरखेडा जि. यवतमाळ व राजु इनोता अंबोरे रा. माहुर जि. नांदेड या दोन आरोपी परिक्षार्थींना अटक करण्यात आली होती.