शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक पॅनल बनविणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; ३ कामगारांचा होरपळून मृत्यू, ८ गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2022 18:17 IST

स्फोटामुळे जवळपासचे आणि कंपनीचेही नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, 

नालासोपारा (मंगेश कराळे): वसई तालुक्यातील चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कॉस पावर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत इलेक्ट्रीकल पार्ट्स आणि पॅनलबोर्ड बनविणाऱ्या कंपनीत हारड्रोजन सिलेंडरचा स्फोट झाला आहे. सदर स्फोटात ३ कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे तर ८ कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले आहे. आग विझवण्यात आली असून कुलिंगचे काम सुरू असल्याचे कळते. कंपनीत आणखी कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जोरात स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले होते. स्फोटामुळे जवळपासचे आणि कंपनीचेही नुकसान झाले आहे.

वसईच्या चंद्रपाडा भागात कॉस पावर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीत इलेक्ट्रिक पार्ट्स आणि पॅनल बनवले जाते. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक कंपनीत  हारड्रोजन सिलेंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोठा आवाज करीत बॉयलर फुटल्याने आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या उंच ज्वाळा पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अपघातावेळी कंपनीत अनेक कामगार काम करीत होते. या अपघातात तीन कामगार जिवंत भाजले आहेत. तर ८ कामगार गंभीर भाजले. अपघाताची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट, वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्व्हे आणि इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मनपाचे अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहे. कंपनीत मदतकार्य सुरू आहे. कंपनीत कामगार अडकल्याची शक्यता आहे. त्यांना सुखरूप बाहेर काढणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. 

ज्या कंपनीत हा अपघात झाला त्या कंपनीला नेमक्या कोणकोणत्या परवानगी आहेत, येथे नेमके काय घडले आहे याची चौकशी केली जाणार आहे. कंपनीत स्फोट झाल्यानंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. इथली परिस्थिती मन हेलावून टाकणारी होती. कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची ओळख पटविणे आणि अजून यात कोणाचा मृत्यू झाला आहे का याचा तपास सुरू असल्याचे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार