शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

मार्क्सवाद्यांचा तहसीलपुढे ठिय्या, स्वयंपाकही केला;लाँगमार्चच्या मान्य मागण्यांची अंमलबजावणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:44 IST

पालघर : शेतकरी, तरुण, महिला व कामगारांच्या मागण्या महाघेराव व लॉंगमार्च नंतर शासनाने मान्य केल्यात. परंतु त्याची अंमलबजावणी प्रशासनाने न केल्याच्या निषेधार्थ बुधवारी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने ठिय्या आंदोलन करून रस्ते जाम करण्यात आले. मागण्या प्रत्यक्ष मान्य होईपर्यंत हा ठिय्या कायम राहणार असल्याने आंदोलकांनी तिथेच स्वयंपाकही केला. ...

पालघर : शेतकरी, तरुण, महिला व कामगारांच्या मागण्या महाघेराव व लॉंगमार्च नंतर शासनाने मान्य केल्यात. परंतु त्याची अंमलबजावणी प्रशासनाने न केल्याच्या निषेधार्थ बुधवारी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने ठिय्या आंदोलन करून रस्ते जाम करण्यात आले. मागण्या प्रत्यक्ष मान्य होईपर्यंत हा ठिय्या कायम राहणार असल्याने आंदोलकांनी तिथेच स्वयंपाकही केला. ते सोबत अंथरुण, पांघरुणही घेऊन आलेले होते.आदिवासी, शेतकऱ्यांच्या अनेक ज्वलंत प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सत्ताधारी सरकार विरोधात नाशिक येथे महामुक्काम, वाड्यात महाघेराव तर नाशिक-मुंबई लाँगमार्च काढण्यात आला होता. या आंदोलनापुढे नमते घेऊन शासनाने मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे असून गोदूताई परु ळेकरांच्या स्मृतीदिन आणि तलवाडा येथे झालेल्या गोळीबाराची आठवण म्हणून पालघर तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर झालेल्या या आंदोलनामुळे रस्ता जाम झाला होता. तसेच जिल्ह्यात शेती, वस्त्यांना उध्वस्त करणारे बुलेट ट्रेन, रेल्वे कॉरिडॉर, महामार्ग स्थानिकांच्या उरावर लादण्यात येत असल्याच्या विरोधात तसेच वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करणे, कूळकायद्याच्या जमिनीची लूट थांबविणे, पीक पाहणी अंमलबजावणी, पाटबंधाºयाचे पाणी स्थानिक शेतकºयांना, जनतेला मिळावे, रेशन व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण करून गैरव्यवहाराना आळा घालावा, रोजगार निर्मिती करावी आदी मागण्याही आंदोलकांनी यावेळी केल्या.चर्चासाठी वरिष्ठ अधिकारीच नाहीविक्रमगड : भाजप प्रणित केद्रं व महाराष्ट्र सरकारचे धनिक धार्जिणे धोरण व खोटया जाहिराती सुरू असून आदिवासींचे हाल होत आहेत. याकडे शासन लक्ष न देता फक्त आश्वासने देत आहेत. या विरुध्द हे ठिय्या आंदोलन करण्यात आल्याची माहिती कॉ. किरण गहला यांनी दिली. महागाई वाढते आहे, डिझेल पेट्रोल, गॅस सिलिंडरचे भाव तर गगनाला भिडले आहे. परंतु शेत मालाला हमी भाव नाही. नुकसान झालेल्या शेतकºयांना भरपाई नाही. नोटा बंदीमुळे सर्वसामान्याचे आजही हाल होत आहेत. रेशनकार्डावर धान्य मिळत नाही. जि.प. शाळांमध्ये शिक्षक नाहीत, वन अधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा. रोजगार हमीची कामे सुरू करा, या मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या.प्रांत कार्यालयावर ठिय्यावाडा : केंद्र व राज्यसरकारच्या धोरणांविरोधात व वाढत्या महागाईविरोधात, तसेच सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या खोट्या आश्वासनांच्या निषेधार्थ मार्क्सवाद्यांनी बुधवारी येथील प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली.डहाणूतही दिला ठिय्याडहाणू : तालुक्यातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नाची सोडवणूक करण्यात यावी, यामागणीसाठी मार्क्सवादी पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी येथील उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यात कॉ. एडवर्ड वरठा, कॉ .लडका कलंगडा, कॉ.लहानी दवडा आदी सहभागी होते.तलासरीतही माकपचे ठिय्या आंदोलनतलासरी : १० आॅक्टोबरला पालघर जिल्ह्यात दरवर्षी माकपतर्फे पाळण्यात येणारा हुतात्मा दिन आणि कॉ. गोदावरी परु ळेकर यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने तहसीलसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात किसान सभा, सीटू, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय व एसएफआय या जनसंघटनाही सामील झाल्या. शेतकºयांना देशोधडीला लावणारे बुलेट ट्रेन, एक्सप्रेस हायवे आणि नदीजोड सारखे प्रकल्प ताबडतोब रद्द करा; वनजमिनी, वरकस जमिनी, देवस्थान व गायरान जमिनी कसणाºयांच्या नावे करा, धरणांचे पाणी येथील जनतेला पिण्यासाठी आणि शेतीसाठी प्राधान्याने द्या आदी मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार