शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील अनेक गटारांवरील झाकणे गायब, महापालिकेचे दुर्लक्ष, दुर्घटना घडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 05:48 IST

महापालिका हद्दीतील गटारांवरील अनेक ठिकाणची झाकणे गायब झाली आहेत. काही अर्धवट अवस्थेत असून काही पूर्ण तुटलेली आहेत. त्यामुळे गटारे उघडी पडली असून त्यात पडून जीव गमावण्याची अथवा दुखापत होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 वसई -  या महापालिका हद्दीतील गटारांवरील अनेक ठिकाणची झाकणे गायब झाली आहेत. काही अर्धवट अवस्थेत असून काही पूर्ण तुटलेली आहेत. त्यामुळे गटारे उघडी पडली असून त्यात पडून जीव गमावण्याची अथवा दुखापत होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.मुंबई झालेल्या पावसात गटारवर झाकणे नसल्याने त्यात पडून वाहून जाऊन दोन डॉक्टरांचा बुडून मृत्यु झाला होता. त्या पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिका हद्दीतील गटारांवरील अनेक ठिकाणची झाकणे गायब झाल्याची बाब युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी उजेडात आणली आहे. वर्तक यांनी आपल्या सहकाºयांसह केलेल्या पाहणीत शहरातील अनेक ठिकाणच्या गटारांची झाकणे गायब, तुटल्याची, अर्धवट अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. त्यांनी फोटोंसह त्याची आयुक्तांकडे तक्रार केली आहे.पावसाळ््यापूर्वी शहरात व्यवस्थित नालेसफाई झालेली नाही. अधिकारी आणि ठेकेदारांची लॉबी दरवर्षी नालेसफाईतून हातसफाई करीत महापालिकेची तिजोरी लुटत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यात आता गटारांवरील झाकणांचा नवा प्रश्न उजेडात आला आहे. गटार बांधल्यानंतर मेनहॉल चेंबरवर झाकणे लावणे गरजेचे असते. पण, अनेकवेळा ती लावली जात नाहीत. लावलेली झाकणे निकृष्ट दर्जाची असल्याने लगेचच तुटतात. तर लोखंडी झाकणे नीट बसवली जात नसल्याने ती चोरीला जातात. याकडेही त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.मेनहॉल चेंबरवर झाकणे नसल्याने पावसाळ््यात जलमय स्थितीत निर्माण होऊन त्यात नागरीक पडून जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत. तर अनेक वेळा त्यात पडून वाहून जाऊन त्यांना जीवालाही मुकावे लागण्याचा प्रकार घडू शकतो. नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन गटारांवरील तुटलेली झाकणे बदलावीत, गायब असलेल्या ठिकाणी झाकणे बसवून मेनहोल ताबडतोब बंद करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.