शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनोरचा आठवडेबाजार पडला ओस

By admin | Updated: November 13, 2016 00:25 IST

प्रत्येक शनिवारी भरणारा मनोरचा आठवडा बाजार भरलाच नाही. गर्दी फक्त बँकांच्या समोर दिसत होती खरेदी करण्यासठी सुटे पैसे नसल्याने ग्राहक दुकानात फिरकलेच

मनोर : प्रत्येक शनिवारी भरणारा मनोरचा आठवडा बाजार भरलाच नाही. गर्दी फक्त बँकांच्या समोर दिसत होती खरेदी करण्यासठी सुटे पैसे नसल्याने ग्राहक दुकानात फिरकलेच नाही. जो ग्राहक ५०० ची नोट घेऊन दुकानात जात होता त्यास दुकानदार कडे सुटे पैसे देण्यासाठी नसल्याने रिकाम्या हाती परतावे लागले. जिथे ४० ते ४५ लाख रुपयांची उलाढाल व्हायची तिथे लाखभराचीही उलाढाल झाली नाही.पालघर तालुक्यात मनोर ही पन्नास ते साठ गावांसाठीची एकमेव बाजारपेठ असून प्रत्येक शनिवारी आठवडा बाजार भरतो. त्यावेळी लोक या बाजारात खरेदीसाठी आवर्जून येतात. आठवडाभराच्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करतात. या बाजार पेठेत ५० किराणा दुकाने, कापडाची २५ ते ३० दुकाने, औषधाची ८ दुकाने, कटलरी, भांड्याची ११ दुकाने, भाजीपाल्याची ७ मोठी दुकाने, घरगुती वस्तूंची ५० ते ६० छोटी दुकाने, सुकीमासळी, ओलीमासळी, मटन, चिकन ,ज्वेलर्स अशी शेकडो दुकाने असतात. बाजार एवढा खच्चून भरतो की गर्दीत वाट काढणे अशक्य होते. परंतु ५००व १००० च्या नोटा रद्द झाल्याने आज आठवडा बाजारावर त्याचा विपरीत परिणाम झाला. सर्वजण एकाच कामात अडकले होते. ते म्हणजे बँकेतून नव्या नोटा घेणे. बाजारातील गर्दी ही महाराष्ट्र बँक , टीडीसी, इलाहाबाद बँक, जव्हार अर्बन बँकांपुढे दिसत होती ज्यांच्या जवळ हजार पाचशे च्या नोटा हात्या ते दुकान जाऊन वस्तू खरेदी करीत मात्र दुकान दारांकडे त्यांना देण्यासाठी सुट्टे पैसे नसल्याने त्या ग्राहकांना एकतर रिकाम्या हाताने परतावे लागत होते. तर कोणी आवश्यकता नसतांना पूर्ण पैशाची खरेदी करीत होते. विनोद जैन भांडी दुकानदार म्हणाले की ग्राहक दुकानात येत होते परंतु त्यांना देण्यासाठी माझ्या कडे सुटे पैसे नसल्याने त्यांना परत जावे लागले कारण मार्केट मध्ये सुट्टे पैसे आलेच नाही आम्ही दुकानदार काय करणार, सुनील लोखंडे म्हणाले की पहिल्यांदा आठवडा बाजार भरला नाही कारण लोकांकडे पैसेच नाही त्या मुळे आम्हा दुकांदारचे ही मोठे नुकसान होत आहे.कांतीलाल जैन म्हणाले की, मोदीजींनी केले ते योग्य केले परंतु या मध्ये सर्वसामान्य लोकांची गोची झाली आहे.