शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण बदलामुळे आंबा हंगाम लांबणार; बागायतदार चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 01:05 IST

आंब्याला उशिरा मोहोर

- राहुल वाडेकरविक्रमगड : तालुक्यात या वर्षी परतीच्या पावसाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून भातशेती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. अशातच परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याचा परिणामआंबा फळ पिकावर होण्याची शक्यता असून आंबा पिकाला उशिरा मोहोर येऊन आंबा उत्पादन लांबण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. दरवर्षी निसर्गाचा वाढत चाललेला लहरीपणा, त्याचबरोबर लांबत असलेला पाऊस व त्यामुळे वातावणात होणारा वारंवार बदल याचा परिणाम आंब्यासारख्या हंगामी पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.

साधारणपणे सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात होते, मात्र या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पावसाने हजेरी लावली. खरे तर नोव्हेंबर महिन्यात थंडी पडायला व डिसेंबर महिन्यात आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होत असते, मात्र थंडीचा मोसम पाहिजे तसा नसल्याने आंब्याला मोहोर येण्याचा हंगाम पुढे सरकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आंबा पिकावर होऊन आंब्याचे पीक ३० ते ३५ दिवस उशिराने येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे आंबा बागायतदार अडचणीत सापडले आहेत. विक्रमगड तालुका व परिसरात १८३ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात बागायती शेतकरी आंबा पीकघेतात.

विक्रमगड तालुक्यात १८३ हेक्टरहून अधिक क्षेत्रात आंबा लागवडीचे उत्पादन घेतले जाते. विक्रमगड तालुक्यात आंबा बागायदार झडपोली, माण, ओंदे, आलोंडे, केव, कुरंजे आदी भागातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेत असून चांगला नफा मिळवत आहेत. परंतु गेल्या दोन-चार वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत नेहमीच फसत असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

परतीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यात तालुक्यातून जात असतो, मात्र या वर्षी परतीच्या पावसाने नोव्हेंबरपर्यंत हजेरी लावली. त्यातच नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडीला सुरुवात होऊन आंबा पिकाला मोहर येण्यास सुरुवात होत असते, मात्र या वर्षी पाहिजे तेवढी थंडी नसल्याने आंब्याच्या झाडांना उशिराने मोहर येण्याची शक्यता असून याचा परिणाम आंबा हंगाम लांबण्याची शक्यता बागायतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आंबे तयार होण्यास जून उजाडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या वर्षी परतीचा पावसाने नोव्हेंबर महिन्यापर्यंत हजेरी लावली तसेच पाहिजे तेवढी थंडी अद्यापपर्यंत नसल्याने याचा परिणाम आंबा मोहर उशिराने येऊन आंबाचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे.-विजय सांबरे, आंबा उत्पादक शेतकरी, ओंदे

टॅग्स :MangoआंबाVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र