शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

घरकाम करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र अखेर सापडले

By admin | Updated: January 14, 2017 06:10 IST

एका घरकाम करणाऱ्या गरीब महिलेचे चोरीला गेलेले मंगळसूत्र परत मिळवून तुळींज पोलिसांनी त्या महिलेला परत केले. याप्रकरणी

वसई : एका घरकाम करणाऱ्या गरीब महिलेचे चोरीला गेलेले मंगळसूत्र परत मिळवून तुळींज पोलिसांनी त्या महिलेला परत केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीलाही अटक केली. तुळींज पोलीस स्टेशनच्या हद्दीत ७ डिसेंबर २०१६ ला दुपारी १ च्या दरम्यान घरकाम करण्यासाठी रस्त्याने पायी जाणाऱ्या प्रमिला प्रकाश सुर्वे या गरीब महिलेला दोन आरोपीनीं शेठला सहा मुलीनंतर मुलगा झाला आहे व गरीब लोकांना पैसे वाटत असल्याचे आमिष दाखवून १५ हजार रुपये किंमतीचे ५ ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली होती. पीडित महिलेने तुळींज पोलीस स्टेशनला फसवणूक झाल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. याफसवणूक प्रकरणी तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राकेश साखरकर, पोलीस सहायक उपनिरीक्षक सुरेंद्र शिंदे, पोलीस हवालदार किरण म्हात्रे, मनोज सकपाळ, लक्ष्मण तलवारे आणि सुनील आव्हाड यांच्या टीमने आरोपी साहिल सलीम खान (३५) याला पकडले. आरोपीकडून प्रमिला सुर्वे यांचे मंगळसूत्र जप्त केले. पीडित महिला अत्यंत गरीब असल्यामुळे सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांकडून परत मिळवण्यासाठी लागणारा आदेश वसई न्यायालयातून अ‍ॅड. केतन बारोट यांनी विनामूल्य आणून दिला. (प्रतिनिधी)