शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे रूपये दंड करा हो! आधी पिकदाण्या तर बसवा!

By admin | Updated: February 5, 2017 02:17 IST

पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या स्टेशन प्रबंंधकांना प्लॅटफॉर्मवर थुंकणाऱ्यास किमान तीन प्रवाशांकडून प्रत्येकी दोनशे प्रमाणे दररोज सहाशे रुपये वसूल

- हितेन नाईक,  पालघर

पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या स्टेशन प्रबंंधकांना प्लॅटफॉर्मवर थुंकणाऱ्यास किमान तीन प्रवाशांकडून प्रत्येकी दोनशे प्रमाणे दररोज सहाशे रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मवर प्रथम पिकदाणीची व्यवस्था करावी नंतरच दंड वसूल करावा असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.‘भारत स्वच्छता मिशन’ अंतर्गत पंतप्रधानांनी देशभर स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सर्वच पातळी वरून तसेच प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम राबविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. रेल्वेप्रशासनानेही स्टेशनवर थुंकणाऱ्या प्रवाश्यांकडून सक्तीने वसुली करण्याचे काम हाती घेतले आहे. डहाणू रोड स्टेशन पर्यंतच्या भागाला वर्ष १९९५ रोजी उपनगरीय सेवा क्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर आजही २२ वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही प्रवाशांना आजही पुरेशा सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. आज दररोज २५ हजार प्रवाशी पालघर स्टेशनवरून प्रवास करीत असून त्यातुन प.रे.ला १ कोटी ५० लाखाचे मासिक उत्पन्न मिळत आहे. आजही या उपनगरीय क्षेत्रातील स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म वर अपुरी शेड, दुरावस्थेतील शौचालये, अपुरे पाणी, बंद इंडिकेटर्स आदि असुविधा आहेत.एकीकडे उपनगरीय दर्जा घोषित करायचा व दुसरीकडे सोयीसुविधा पुरविण्याबाबत उदासीनता दाखवून उलट प्रवाशांकडूनच उपनगरीय कर बेकायदेशिररित्या वसूल करायचा, पिकदाणीसारख्या सुविधा उपलब्ध करून न देता थुंकणाऱ्यांकडून कर दंड वसूल करायचा ही सुलतानी असल्याची प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करीत आहेत. प्रवाशांचा खडा सवालरेल्वे प्रशासनाने प्रत्येक स्टेशन वर थुंकणाऱ्या प्रवाशांकडून प्रत्येकी २०० रूपये दंड वसूल करण्याचे आदेश स्टेशन प्रबंधकांना दिले आहेत. दररोज कमीतकमी तीन प्रवाशांकडून ६०० रु पये जमा करावे असे आदेश दिले असले तरी स्टेशनवर थुंकण्यासाठी रेल्वे ने पिकदाणी ची व्यवस्थाच केली नसतांना प्रवाशांनी थुकावे कुठे? असाही प्रश्न संतोष चुरी,अभय दारु वाले ह्या प्रवाशांकडून उपस्थित केला गेला आहे. त्याचे कोणते उत्तर रेल्वेकडे आहे?पालघर स्टेशनवर थुंकणारे बहुतांशी प्रवासी असतात त्यांच्याकडून दंड वसूल करणे खूप कठीण होते. याचा विचार प्रशासनाने करावा- सी एच कोहली, स्टेशन प्रबंधक, पालघर.