शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमधून उदयास येणार माकुणसार ए-२ जैविक दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 02:11 IST

दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या माकूणसारच्या दुधाची स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी ‘माकूणसार ब्रँड’ निर्मितीसाठी सर्व दूध उत्पादक संघटित झाले

- हितेन नाईक पालघर : जिल्ह्यात दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या माकूणसारच्या दुधाची स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी ‘माकूणसार ब्रँड’ निर्मितीसाठी सर्व दूध उत्पादक संघटित झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.शुक्र वारी सफाळ्याच्या देवभूमी हॉल मध्ये दुधउत्पादकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.माकूणसार हे शेतकरी, बागायतदारांचे गाव दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. उत्पादकांना दूध मुंबईत नेता यावे यासाठी ३० वर्षाआधी पासून पहाटे सफाळ्याला थांबणाºया रेल्वेला एक स्वतंत्र बोगी जोडण्यात आली होती. ‘दूधवाला डब्बा’ म्हणून तो सर्वत्र परिचित होता. हे दूध विरार ,मुंबई येथे वितरित केले जात होते. जिल्हातील दूध उत्पादक संघांनी त्याला पाठिंबा दर्शविला. मात्र त्याला रास्त भाव मिळत नसल्याने त्यांनी एकत्र येऊन स्वतंत्र ब्रँडिंग करण्याचे स्वप्न सफळ्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण राऊत ह्यांनी पाहिले. त्यासाठी शेकडो दूध उत्पादक २३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले होते.या गावात लहान मोठे ६५ दूध उत्पादक शेतकरी असून सुमारे १८ ते २० हजार लिटर दुधाचे दररोज उत्पादन होते. यापैकी अधिकतर दूध सध्या एका सहकारी संघाला देऊन उर्वरित दूध वसई तालुका व मुंबईच्या उपनगरात आजही वितरित करण्यात येते. या उत्पादकांनी पालघर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून अद्ययावत दूध कंपनी स्थापन करण्याची इच्छा जिल्हाधिकाºयां कडे व्यक्त केली होती. प्रवीण राऊत, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, चिंतामण ठाकूर, नागेश पाटील, विशाल वर्तक यांनी त्यांची भेट घेऊन ठोस पावले उचलण्याबाबत चर्चा केली होती.या ब्रँडची उभारणी करण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट अंतर्गत आवश्यक नोंदणी करून तबेल्यांच्या पाहणीसाठी यांची पशु वैद्यकीय अधिकाºयांचा दौरा आयोजित करणे, दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी संबंधित अधिकाºयांनी मार्गदर्शन करणे, या भागातील शेतकºयांचा संगमनेर, श्रीरामपूर, नाशिक आदी भागातील मोठ्या आणि मध्यम स्वरूपाच्या डेअरींचा पाहणी दौरा आयोजित करून दूध संकलन ते प्रक्रि या- विक्र ी यांची माहिती द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली होती.जिल्हाधिकाºयांनी त्यांच्यासाठी दुग्ध व्यवसाय : आव्हाने आणि संधी या कार्यक्र माचे आयोजन उद्या (शुक्र वारी) सफाळ्याच्या देवभूमी हॉल मध्ये सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्र मात दूध प्रक्रि येवर प्रभात डेअरीचे सारंग पुरनाळे, सेंद्रियशेती प्रमाणीकरण, सेंद्रिय दूध उत्पादन वर डॉ. प्रशांत नाईकवाडी, पंचगव्य व गांडूळखत वर विशेषज्ञ उत्तम सहाणे, डॉ.किशोर बोकील आदी मार्गदर्शन करणार आहेत.

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठा