शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधीक्षक कार्यालयांतर्गत योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार?, आर्थिक अनियमितता झाल्याचा जि. प. उपाध्यक्षांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 01:09 IST

Palghar : आधुनिक कृषी तंत्राच्या वापरासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आवश्यक त्या सर्व संसाधनांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारी एक यंत्रणा असावी, यादृष्टीने कृषी विभागाची रचना करण्यात आली आहे.

पालघर : जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत राबवावयाच्या योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी न होता या योजना कागदावरच राबविल्या जात आहेत. यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून योजना राबविण्याच्या नावाखाली ३० टक्केची मागणी केली जात असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी करून जिल्हा कृषी अधीक्षकांच्या विभागीय चौकशीची मागणी राज्यपालांकडे केली आहे.आधुनिक कृषी तंत्राच्या वापरासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आवश्यक त्या सर्व संसाधनांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारी एक यंत्रणा असावी, यादृष्टीने कृषी विभागाची रचना करण्यात आली आहे. तीन ते चार खेड्यांसाठी एक कृषी साहाय्यकाचे पद देण्यात आले असून, या कृषी साहाय्यकांचे कार्यक्षेत्र असलेल्या शेतकरी कुटुंबाची सरासरी संख्या ८०० ते ९०० पर्यंत असल्यामुळे शासनाचे कृषी तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे सुलभ झाले असल्याचा दावा जरी केला जात असला तरी या कृषीविषयक योजनांची योग्यरीत्या अंमलबजावणी जिल्ह्यातल्या कृषी अधीक्षक कार्यालयाकडून होत नसल्याचा आरोप जि.प.चे उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी केल्याने कृषी विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.जिल्हा अस्तित्वात येऊन सहा वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे कोलमडलेले आर्थिक गणित आजही पूर्वपदावर आल्याचे दिसून येत नाही. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातून यांत्रिकीकरण योजना, मागेल त्याला शेततळे, नवीन विहिरी खोदणे, जुन्या विहिरी दुरुस्ती, शेततळे अस्तरीकरण, बियाणे, खते, कीटकनाशके परवाने, रोपवाटिका, हरितगृह, शेडनेट आदी ४२च्या वर योजना राबविल्या जात असून या योजना फक्त कागदावरच दिसत आहेत. प्रत्यक्षात अंमलबजावणीचे चित्र मात्र निराशाजनक असल्याचे उपाध्यक्ष सांबरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

जिल्ह्यातील कृषी योजनांवर खर्च झाला असेल, तर शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्षात भेट दिल्यावर वस्तुस्थिती समोर येईल. ३० टक्के घेतल्याशिवाय कामे केली जात नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत.- नीलेश सांबरे, उपाध्यक्ष, जि. प.पालघर

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय हे राज्यातील कृषीसंदर्भातील महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करीत असते.  लाभार्थ्यांना थेट हस्तांतरण करण्याची प्रक्रिया असल्याने गैरव्यवहाराचा प्रश्न उरत नाही. योजना राबविण्याबाबतची सर्व माहिती तालुका स्तरावरून उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.- काशिनाथ तरकसे,     जिल्हा कृषी अधीक्षक

टॅग्स :Vasai Virarवसई विरार