शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मित्र वाचवतोय १८ वर्षे सर्पांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:21 IST

सर्प दिसताच अनेकाची बोबडी वळते. सर्प दिसताच त्याला पकडण्यासाठी दीक्षित सराना फोन करा असे शब्द अनेकांच्या तोंडून निघतात हा सर्प वेडा सर्पमित्र त्या ठिकाणी तत्काळ त्या ठिकाणी हजर.

राहुल वाडेकर 

विक्रमगड : सर्प दिसताच अनेकाची बोबडी वळते. सर्प दिसताच त्याला पकडण्यासाठी दीक्षित सराना फोन करा असे शब्द अनेकांच्या तोंडून निघतात हा सर्प वेडा सर्पमित्र त्या ठिकाणी तत्काळ त्या ठिकाणी हजर. आणि अंगावर शहारे आणारा थरार सुरु होतो. एखादे फूलपाखरू पकडावे. तसे अलगद सापाला पकडून ज्याच्या घरी किवा शेतात सर्प होता.त्यांना घेऊन जंगलात त्या पकडलेल्या सापाला सोडून परत तो आपल्या घरी येतो. स्वताच्या स्वखर्चाने केवल समाजकार्य म्हणून सापाला जीवदान, पर्यायाने माणसाला जीवदान व सापा विषयी समाजप्रबोधन अशा तिहेरी भूमिकेत विक्रमगड येथील सर्प मित्र पेशेन शिक्षक असलेला गोपाळ दीक्षित सर.. गेल्या १८ वर्षा पासून आखंड पने कार्य करत आहेत. आता पर्यत त्यानी १३०० सापाना जीवदान दिले आहे.. सापांविषयी असलेल्या गैरसमजामुळे साप दिसल्यावर त्याला मारण्यात येते. वास्तविक, साप हा पर्यावरणाच्या जीवनचक्रातील महत्त्वाचा घटक आहे. सरपमित्र गोपाळ अरूण दीक्षित सर विक्र मगड हायस्कूल येथे १९९७ पासून कार्यरत आहे. गेली १८ वर्षापासून विक्रमगडमध्ये सर्पमित्र म्हणून कार्यरत.या कार्याची दखल घेऊन वनविभाग महाराष्ट्र शासनाकडून सर्पमित्र म्हणून ओळखपत्र मिळालेले विक्रमगड तालुक्यातील पहले सर्पमित्र आहेत.अनेक संस्थाच्या मदतीने पर्यावरण विषयक जनजागृतीमध्ये सहभाग त्यानी घेतला आहे. विक्र मगड, वाडा, जव्हार, मोखाडा परिसरात येथे वनविभागाच्या सहाय्याने वन्यजीव संवर्धनामध्ये मोलाचे सहकार्य केले आहे. आतापर्यंत त्यानी १३०० सर्प पकडून त्यांना वनांत सोडले आहे. वास्तविक, साप दूध पीत नाही. सापाची शरीररचना मांसाहारी असल्याने तो दगावतो. असे असतानाही त्याला दूध पाजण्याचा अट्टाहास केला जातो. शेतीसाठी उपद्रवी ठरणाº्या उंदरांना साप खातो. त्यामुळे अन्नधान्याचे नुकसान होत नाही. भारतात सापाच्या २६३ जाती आहेत. यापैकी काही बिनविषारी, विषारी व काही सौम्य विषारी आहेत. मात्र, बिनविषारी सापांचे प्रमाण जास्त आहे.यात नाग, मण्यार, घोणस, फुरसे, रातसर्प, पोवळा व समुद्रसाप हे विषारी आहेत. मांजºया, हरणटोळ, रेतीसर्प आदी सौम्य विषारी व धामण, मांडूळ, कवड्या, गवत्या, धूळनागीण, पाणदिवड्या, चित्रांक, नायकूळ व डुरक्या इत्यादी बिनविषारी साप आहेत. पालघर व ठाणे जिल्ह्यात अनेक प्रकारचे साप आढळतात. अशी माहिती विक्रमगड येथील सर्प मित्र गोपाल दीक्षित यानी दिली. त्याच प्रमाणे नागपंचिमला त्यानी विक्र मगड, जव्हार परीसरातील खेडो-पाडी विषारी बिनविषारी सर्पांबद्दल जनजागृती करून ते वाचविण्याचा संकल्प प्रत्येकाने नागपंचमीला करावा, असे आवाहन विक्रमगड येथील सर्पमित्र गोपाळ दीक्षित (सर) यानी केले आहे.