शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र मिशन १ मिलियन : पालघर जिल्हा बनला फुटबॉलमय, पालकमंत्री विष्णू सवरांच्या हस्ते शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 04:09 IST

फिफा वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्र ीडा विभागाने राज्यात ‘महाराष्ट्र मिशन १ मिलियन’ हे फुटबॉल खेळाबाबत विद्यार्थी व तरुणांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून अभियान राबविले आहे.

पालघर/वाडा : फिफा वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्र ीडा विभागाने राज्यात ‘महाराष्ट्र मिशन १ मिलियन’ हे फुटबॉल खेळाबाबत विद्यार्थी व तरुणांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून अभियान राबविले आहे. या अंतर्गत शुक्र वारी राज्यभरातील १० लाख विद्यार्थी एकाच दिवशी फुटबॉल खेळणार आहेत. यात पालघर जिल्ह्यातील सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार असून त्याचा शुभारंभ राज्याचे आदिवासी विकासमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरांच्या हस्ते वाड्यात करण्यात आले.फुटबॉल खेळामध्ये सर्वाधिक महत्व असलेला फिफा वर्ल्डकप भारतात होत आहे. या खेळाविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून राज्यभर आज १० लाख विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. पालघर जिल्ह्यातील शेकडो शाळांमध्ये फुटबॉल खेळला गेल्याने संपूर्ण जिल्हा फुटबॉलमय बनला होता. या अभियानाच्या जिल्हास्तरावरील फुटबॉल खेळाचा शुभारंभ मंत्री हस्ते वाड्यातील पी. जे. हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोळे, भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप पवार, तालुका क्र ीडा अधिकारी शरद कलावंत, शिक्षण विस्तार अधिकारी विजय बाराथे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड, श्रीकांत आंबवणे आदी उपस्थित होते.यावेळी सवरा म्हणाले की, राज्यात आज लाखो विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. फुटबॉल सारख्या खेळाला जगात मान्यता आहे. या खेळावर जगभरातील लोक प्रचंड प्रेम करतात. या अभियानातून आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन फुटबॉलमध्ये करीयर केले तर आपल्या देशाला उद्योन्मूख खेळाडू मिळतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.त्याचप्रमाणे यावेळी ‘महाराष्ट्र मिशन १ मिलियन’ फुटबॉल खेळ अंतर्गत घेतलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मंत्री सवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्र ीडाशिक्षक भीमराव गवई, बी. के. पाटील यांच्या विशेष मेहनत घेतली.