शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तोरंगणघाटात लुटालुटीला ऊत

By admin | Updated: July 26, 2016 03:04 IST

मोखाडा तालुक्यातील तोरंगणघाटामध्ये वळणावर एका बाजूने चढाव व दुसऱ्या बाजूने उतार असल्याने त्या दरम्यान येणाऱ्या व जाणाऱ्या गाडयांचा वेग आपोआप कमी करावा

विक्रमगड : मोखाडा तालुक्यातील तोरंगणघाटामध्ये वळणावर एका बाजूने चढाव व दुसऱ्या बाजूने उतार असल्याने त्या दरम्यान येणाऱ्या व जाणाऱ्या गाडयांचा वेग आपोआप कमी करावा लागतो़ तसेच या दरम्यान पाच ते दहा किलो मीटरपर्यंत घनदाट जंगल व आजूबाजू कोणातीही वस्ती अगर घरे नाहीत़ याच संधीचा फायदा घेत आठ दहा जणांची टोळी वाहनांवर दगडफेक करून अथवा ते थांबवून रात्री लुटमार करीत आहे.या टोळीमध्ये दोन तीन महिलांचा समावेश आहे. गाडीला हात करुन थांबविण्याचा प्रयत्न केला जातो़ गाडी थांबली तर लूट करण्याचा त्याचा इरादा असतो,जर गाडी थांबली नाही तर गाडीवर चालकाच्या दिशेने जोराने दगडफेक केली जाते़ त्यामध्ये जर वाहनचालकास दगड लागला तर अपघात घडून गाडी थांबल्यास लूट केली जाते़ हा प्रकार सर्रास चालू असतांनाही प्रशासनाकडून मात्र सुरक्षतेसाठी काहीच उपाय योजना नाही़ हा मार्ग नाशिक त्र्यंबकेश्वर,जव्हार,विक्रमगड असा असून सध्या रात्री या मार्गावरुन येणे धोक्याचे बनले आहे़ त्यामुळे या भागात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे़दरम्यानच्या विक्रमगड येथील राहाणारे रविंद्र तुकाराम आयरे व त्यांचे कुंटुंबीय,मित्रमंडळी यांसह नाशिकहून विक्रमगड येथे येत असतांना रात्री ११ वाजताचे सुमारास त्यांचेकडील एर्टीगा तोरंगणघाटामध्ये वळणावर आली असता रस्त्याच्या उजव्या बाजूकडून आठ ते दहा लोकांची टोळी त्यामध्ये दोन तीन महिला दिसत होत्या. त्यामधील दोन तरुण व्यक्ती गाडी थांबविण्याकरीता हात देत गाडी थांबवा गाडी थांबवा याप्रमाणे गाडी थांबविण्याचा प्रयत्न करीत होते़ परंतु या ठिकाणी असे प्रकार घडत असल्याची जाणीव रविंद्र आयरे यांना असल्याने त्यांनी गाडी न थांबविता गाडीचा वेग वाढविला व कसेबसे वळण कापले़ गाडी थांबली जात नाही हे पाहून या सर्व लोकांनी कारच्या दिशेने दगडफेक केली. यात काही दुर्दैवी घटना घडली नसली तरी असे प्रकार वाढलेले असून या भागात पोलिसांची गस्त तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. या दगडफेकीनंतर रवींद्र आयरे हे जवळच असलेल्या मोखाडा पोलीस चौकीत गेले असतांना तेथे कुणीही हजर नव्हते. (वार्ताहर)काल आम्ही प्रवास करीत असतांना तोरंगणघाटामध्ये प्रथमच असा प्रकार पाहीला व खूप भयभीत झालो़ आमच्या गाडीवर जोराने दगडफेक करुन हल्ला करण्यात आला,मात्र काचा बंद असल्याने हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही़ मात्र या भागत पोलिसांनी जास्त लक्ष घालून गस्त वाढविण्याची गरज आहे़ कारण ही आठ ते दहा जनांची टोळी येथे सक्रीय असून लुटण्याकरिता ती एखाद्याचा जीव घेऊ शकते़- संदेश राऊत, विक्रमगड