शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इफेक्ट: चिंचणीत पाणीपुरवठा सुरू; आठ दिवसांपासून पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 23:25 IST

परिसरातील महिलांची वणवण

डहाणू : डहाणूच्या बंदरपट्टी भागातील सर्वात मोठ्या चिंचणी गावात गेल्या आठ-नऊ दिवसापासून पिण्याचे पाणी येत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत होते. विशेष म्हणजे चिंचणी गावात पिण्याचे पाण्याची विहिरीची संख्या कमी असल्याने महिलांना बोअरिंगचे गढूळ पाणी भरावे लागत होते. मात्र आज याबाबतीत लोकमतने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्याने पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे होऊन पाणीपुरवठा सुरू केल्याने ग्रामस्थाने सुटकेचा निश्वास सोडला. डहाणू तालुक्यातील सर्वात मोठ्या चिंचणी ग्रामपंचायत हद्दीतील नळ कनेक्शनधारक ग्रामस्थांवर एक कोटीची थकबाकी झाली होती. वारंवार सूचना नोटिसा देऊनही ही बहुसंख्य ग्रामस्थ बिले भरत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार ठप्प झाला होता. शिवाय ग्रामपंचायतीने पंचायत समितीला दिलेल्या चेकही बाऊन्स झाल्याने पंचायत समिती दहा नमुने चिंचणी गावात पाणीपुरवठा कपात करण्याच्या निर्णय घेतल्याने गेल्या आठ-दहा दिवस पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली होती. याबाबतीत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच बहुसंख्य ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासनाला जाब विचारला, तर चिंचणी ग्रामपंचायत प्रशासनाची देखील धावपळ उडाली होती. त्यामुळे आजअखेर ग्रामपंचायतीने तसेच पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ चिंचणी गावाला पाणीपुरवठा सुरू केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून ‘लोकमत’चे आभार मानले. शुक्रवारी ग्रामपंचायत चिंचणीने गावात पाणीपुरवठा सुरू केला असला तरी प्रशासनाने थकबाकीदारांकडून थकबाकी वसुली करण्याची मोहीम सुरू केली असून पाण्याचे बिल न भरणाऱ्या लोकांच्या पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे.ग्रामस्थांनी मानले आभारपंचायत समितीने चिंचणी गावाला तत्काळ पाणीपुरवठा सुरू केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून ‘लोकमत’चे आभार मानले.

टॅग्स :Waterपाणी