शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

कर्ज, उधारीच्या जाचामुळे वाढले कुपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 02:36 IST

जुलै २०१७ पासून अंगणवाडीत बालकांना देण्यात येणा-या पोषण आहाराची बिले दिली गेलेली नाहीत. त्यामध्ये सततची अनियमितता आहे.

- रवींद्र साळवेमोखाडा : जुलै २०१७ पासून अंगणवाडीत बालकांना देण्यात येणा-या पोषण आहाराची बिले दिली गेलेली नाहीत. त्यामध्ये सततची अनियमितता आहे. परिणामी, जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये दिला जाणारा पोषण आहार आता जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर आला आहे. मागील काही महिने हा आहार पुरवणा-या महिलांनी आपले दागिने गहाण ठेवून, सावकार, बँक तसेच बचत गटांतून कर्ज काढून आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. कर्ज आणि उधारीच्या जाचात अडकलेल्या या महिला आता हतबल झाल्या असून त्यांच्या हतबलतेचे थेट परिणाम कुपोषणावर झाले आहेत.शासनस्तरावरील या अनास्थेमुळे पालघर जिल्हा पुन्हा एकदा कुपोषणाच्या विळख्यात सापडला असल्याचे हे चित्र श्रमजीवी संघटनेने पुन्हा एकदा माहितीच्या अधिकारातून जनतेसमोर आणले आहे. डिसेंबर या एका महिन्यात तब्बल ८७८ कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये १७६ अतितीव्र कुपोषित, तर ७०२ तीव्र इतकी लक्षणीय वाढ बालकांच्या संख्येमध्ये झाली आहे. १९९२-९३ साली जव्हारमधील वावर-वांगणी भागात घडलेल्या बालमृत्यूंच्या तांडवानंतर त्या काळातील सरकारने या जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करून काही धोरणात्मक निर्णय घेतले होते. याच काळात जव्हारला उपजिल्ह्याचा दर्जा दिलेला होता. मात्र, ठाणे जिल्हा विभाजनानंतर जव्हार, मोखाडा पूर्णपणे दुर्लक्षित झाला आणि त्याचे परिणाम म्हणून वर्षाला सरासरीपेक्षा जास्त बालकांना जीव गमवावा लागला.जिल्ह्यात डिसेंबर २०१७ मध्ये ६७५ अतितीव्र कुपोषित, तर ४७६७ तीव्र कुपोषित असे एकूण ५४४२ बालक असल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.धक्कादायक बाब म्हणजे यातील ३६८ अतितीव्र कुपोषित आणि २५३८ तीव्र कुपोषित अशी एकूण २९०६ बालके आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या विक्रमगड मतदारसंघातील आहेत. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी तर कुपोषणावर मात करण्यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा शुभारंभ याच त्यांच्या मतदारसंघातून केला, मात्र ही योजनादेखील पूर्णपणे अपयशी ठरली असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी झालेल्या उपाययोजनेनंतर कुपोषण काही प्रमाणात का होईना नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा येथील जनतेला होती.>मोखाड्यातील विदारक चित्रज्या सागर वाघ या कुपोषित बालकाच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र खळबळ माजलेली आहे, त्या कमलवाडी येथेही दुर्दैवाने हीच परिस्थिती आहे. येथे एकूण ३९ लाभार्थी आहेत. या महिलांनाही दागिना गहाण ठेवून पोषण आहार शिजवण्याची नामुश्की ओढवली आहे. डिसेंबर २०१७ या एकाच महिन्यात तब्बल ८७८ कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मध्ये १७६ अतितीव्र कुपोषित, तर ७२० तीव्र इतकी विदारक स्थिती आहे.>लहानग्यांच्या ताटामध्ये फक्त सुकी खिचडीजव्हारमधील चौथ्याचीच्या अंगणवाडीमध्ये एकूण ९३ लाभार्थी असून पोषण आहार लाभार्थी बालकांची संख्या ४३ आहेत. येथे आहार शिजवण्याची जबाबदारी सुवासिनी बचत गटाकडे असून ती बिले शासनाकडून वेळेवर अदा होत नाहीत. त्यामुळे या महिलांनी उसनवारी करून तसेच मंगळसूत्र गहाण ठेवून पोषण आहाराचा गाडा हाकला आहे. या परिस्थितीमुळे लहानग्यांना गत काही महिन्यांपासून फक्त सुकी खिचडी खावी लागत आहे. याठिकाणी १) अश्विनी राम दुमाडा- ६ वर्षे- ११.५०० किलोग्रॅम,२) यशश्री प्रकाश मुकणे - ६ वर्षे - १४.४०० किलो ग्राम ३) अंकिता शांताराम रामल - ६ वर्षे पूर्ण - ९.१०० किलोग्रॅम, ४) तेजस रामा दुमाडा- २ वर्षे- ७.६०० किलोग्रॅम ही चार तीव्र कुपोषित बालके असल्याची माहिती पुढे येत आहे.>जिल्हा प्रशासनाच्यावतिने आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कुपोषणाची समस्या असणाºया सर्व तालुक्यात सर्व्हेक्षण केले असून त्या अनुशंगाने उपाय योजना करण्यात आल्या आहेत. त्याने कुपोषणाचे प्रमाण कमी होणार असून रोजगार वाढणार आहे. येत्या मार्च महिन्यात रिझल्ट हाती येतील.- मिलिंद बोरीकर,मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर जि.प.