शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बोईसरच्या ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांसह कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 23:51 IST

गंभीर बाब म्हणजे या इमारतीचा वरील संपूर्ण भाग ज्या लाकडी तुळई (बीम) वर अवलंबून आहे,

- पंकज राऊतबोईसर : बोईसर ग्रामीण रुग्णालयाची इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने ती कधीही कोसळण्याची शक्यता असून ही इमारत वापरण्यास योग्य नसल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याने दिला आहे. मात्र तरीही या धोकादायक इमारतीमध्ये प्रतिदिन शेकडो रुग्णांवर उपचार केले जात असल्याने आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांबरोबरच रुग्णांच्या जीवाला धोका कधीही उद्भवू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

रुग्णालयाचा आतील व बाहेरील भाग अक्षरशः लोखंडी चॅनेलच्या (अँगल) आधारावर उभ्या असलेल्या या इमारतीतील रुग्णालयात गोरगरीब आदिवासी आणि तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या कुटुंबांबरोबरच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपचारांसाठी येत असतात. त्यामध्ये साथीच्या आजाराच्या रुग्णांसह साप व कुत्रा चावलेले, बाळंतपण असे सुमारे दोनशे रुग्ण प्रतिदिन येत असतात. या सर्वांच्या जीवाशी खेळ सध्या सुरू असून या जीर्ण झालेल्या इमारतीतील रुग्णालयामध्ये प्रसूती कक्ष, लसीकरण, रक्त तपासणी, अपघात, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग आजही सुरू आहेत. ही संपूर्ण इमारत पावसाळ्यात पूर्णपणे गळत असून इमारतीच्या भल्यामोठ्या छतावर दरवर्षी प्लास्टिक टाकावे लागते.

गंभीर बाब म्हणजे या इमारतीचा वरील संपूर्ण भाग ज्या लाकडी तुळई (बीम) वर अवलंबून आहे, जेथे बाह्यरुग्ण विभाग सुरू आहे. या लाकडी बीमला तडा गेला असून त्याला तात्पुरता आधार दिला गेला आहे. तर पहिला मजला पावसाच्या पाण्याच्या गळतीमुळे कमकुवत झाला आहे. या इमारतीला ७४ वर्षे पूर्ण झाली असून दगडी पायावर उभी असलेली ही इमारत वापरण्यालायक नसल्याचे तसेच येथे कुठल्याही प्रकारचे कामकाज करू नये, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याने केल्या आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार