शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी लागवड लांबण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 00:58 IST

ढगाळ हवामान : उत्पादनात घट ?

लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : तालुक्यात आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने परतीच्या पावसाने ओली झालेली जमीन सुकण्यात अडथळा येत आहे. दरम्यान, वापशाअभावी जमिनीच्या उखळणीची कामे मंदावल्याने पालघर जिल्ह्यातील रब्बी लागवड लांबण्याची शक्यता आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे रब्बी लागवडीपूर्व प्रशिक्षणाची गरज निर्माण झाली आहे.

मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस पडल्याने नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा उलटूनही शेतजमिनीला वापसा आलेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामाकरिता जमिनीची उखळणी करण्यात अडचण येत असून लागवड लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालघर जिल्ह्यात किनारपट्टी भागात हिरवी आणि ढोबळी मिरचीची आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. 

ही पिके प्रतिकूल हवामान बदलांना अधिक लवकर बळी पडते. जमिनीत ओलावा असल्यास मुळकुजव्या आणि अन्य बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढून रोपे रोगग्रस्त होऊन सरासरी उत्पादन घटते. शिवाय उन्हाळी कांदा बी पेरणी उशिरा होऊ शकते. त्यामुळे शेत पीक बाजारात उशिरा आल्यास दर कमी मिळतो.

मागील वर्षी परतीच्या पावसाने हंगाम लांबल्याने वांग्याच्या रोपांची वाढ झाली, मात्र त्याची फळधारणा खूपच कमी प्रमाणात झाली. वालाच्या शेंगांमध्ये दाणा चांगला भरलाही नव्हता. ही स्थिती कमी-अधिक फरकाने सर्वच पिकांबाबत सारखीच झाली होती. त्यामुळे कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना रब्बी लागवड पूर्व प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

या हंगामातील पिकेपालघर जिल्ह्यात या हंगामात वाल, हरभरा ही कडधान्ये तसेच वांगी, मिरची, टोमॅटो या नगदी पिकासह वेलवर्गीय व मुळा, पालक, पातीचा कांदा इ. भाजीपाल्याची लागवड केली जाते. किनारपट्टी भागात हिरवी आणि ढोबळी मिरचीची आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. हे पीक प्रतिकूल हवामान बदलांना अधिक लवकर बळी पडते.