शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

इराणी दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:06 IST

पालघर सत्र न्यायालयाचा निकाल

डहाणू/बोर्डी : तालुक्यातील बावडा येथील चिकूवाडीत राहणाऱ्या इराणी दांपत्याच्या घरी दरोडा घालून त्यांचा खून करणाºया आरोपी मोहमद रफीक आदम शेख ऊर्फ रवी रामखिलावनसिंग ठाकूर यास पालघर सत्र न्यायालयाने तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर अन्य आरोपी भगवानलाल मोहनलाल कुमावत (रा. सुरत) याला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.

९ डिसेंबर २०१४ रोजी आरोपींनी बावडा येथील अर्देसर इराणी (७६) आणि नर्गिस नौशीर इराणी (७४) यांच्या चिकूवाडीतील बंगल्यात दरोडा घातला होता. त्या वेळी या दाम्पत्याने विरोध केल्याने नर्गिस यांचा धारदार कटरने गळा चिरला, तर अर्देसर यांच्या डोक्यावर काठी व कटरने वार करून ठार त्यांना ठार केले होते. त्यानंतर कपाटातील रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल चोरून पळ काढला होता. या दांपत्याकडे घरकाम करणाºया सुरेखा सुरेश पारधी यांनी वाणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासी अंमलदार ए.पी.आय. अरुण फेगडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकांत साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून आरोपी मोहम्मद रफीक आदम शेख ऊर्फ रवी रामखिलावनसिंग ठाकूर, भगवानलाल मोहनलाल कुमावत यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या वेळी न्यायालयात फिर्यादी पक्षातर्फे २७ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या.फाशीच्या शिक्षेची मागणीसहाय्यक सरकारी अभियोक्ता डी. आर. तरे यांनी युक्तिवाद करताना आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. मात्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी आरोपी मोहम्मद रफीक आदम शेख यास दोषी ठरवून तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर अन्य आरोपी भगवानलाल कुमावत याची निर्दोष मुक्तता केली.

टॅग्स :Courtन्यायालयMurderखून