शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मतांच्या भिकाऱ्यांना चले जाव म्हणूया - फादर दिब्रिटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 02:21 IST

विश्वासघात करणा-यांविरूद्ध आजपासूनच उग्र आंदोलन सुरू करू या; चंद्रशेखर प्रभूंचे आवाहन

पारोळ : वसई विरार शहर तीन दिवस पाण्याखाली बुडविण्यास येथील महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनीधी जबाबदार असून निवडणुकीत मतांची भीक मागणा-या भिका-यांना चले जाव म्हणण्याचे आवश्यकता आहे, असे प्रतिपादन फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनीयेथे रविवारी झालेल्या वसई का बुडाली या परिसंवादात केले.ज्येष्ठ नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू हे देखील यावेळी उपस्थित होते. येथील पर्यावरण संवर्धन समिती तर्फे रविवारी संध्याकाळी समाज उन्नती मंडळ हॉल मध्ये आयोजित या परिसंवादास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.जेष्ठ साहित्यिक व हरित वसई चे पुरस्कर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यावेळी म्हणाले की, वसईच्या ज्ञात इतिहासात प्रथमच वसईचा जगाशी संपर्क तुटला, तसेच तब्बल तीन दिवस प्रथमच पूर्व-पश्चिम आणि शहरी-ग्रामीण अशी संपूर्ण वसई पाण्याखाली आली. याची सूक्ष्म कारणमीमांसा होण्यासाठी महापालिकेच्या कारभाराचे कठोर आॅडिट होणे गरजेचे आहे. निसर्गाशी खेळून येथील अनियोजित विकास लादल्या जात आहे. आमचा लढा कुणा व्यक्ती विरुद्ध नाही, तर सामान्यांचे हक्क ओरबाडणाºया प्रवृत्ती विरोधात आहे. पुन्हा वसई बुडू नये, यासाठी शहरास शासनाचे जनतेच्या प्रती प्रतिनिधित्व करणारा आयुक्त आणि लोकांच्या संवेदना जपणारा नगरसेवक हवा आहे. त्याकरता जनसामान्यांनी संघटित होऊन आपल्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करणे आवश्यक आहे. म्हणूनच पुढील काळात आपला प्रतिनिधी जबाबदारीने निवडा. जेव्हा कुणी वाली उरत नाही तेव्हा मवाल्यांचा सुळसुळाट होतो. त्यासाठी आता जागृत होणे गरजेचे आहे.बिल्डर, राजकारणी आणि भ्रष्ट अधिकाºयांच्या अभद्र युतीतून शहरांचे वाटोळे करणारे विकास आराखडे राबवले जात असून, निचºया अभावी दोन-अढीचशे मीमी पाऊसाने तीन दिवस शहर बुडणे ही लाजिरवाणी बाब असल्याचा आरोप करून, चंद्रशेखर प्रभू यावेळी म्हणाले की, ज्यांनी यातना देऊन तुम्हाला रडवले त्यांना रडवण्यासाठी आता गांव आणि शहरातील जनतेने एकत्र येऊन लढा उभारणे आवश्यक आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार