शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

रोहयो मजुरांना कष्टाची अल्प मजुरी

By admin | Updated: September 9, 2016 02:43 IST

तालुक्यातील बेहेडगांव येथील मजुरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रोहयो मजुरांनी, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीवर रस्त्याच्या कामात काम अधिक करूनही केलेल्या कामाची मजुरी

जव्हार : तालुक्यातील बेहेडगांव येथील मजुरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रोहयो मजुरांनी, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीवर रस्त्याच्या कामात काम अधिक करूनही केलेल्या कामाची मजुरी अल्प मिळाल्यान मजुरांनी सां. बा. विभागावर खापर फोडत संताप व्याक्त केला असून चौकशीची मागणी केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत सायवन ते घोडीपाडा, बेहेडगांव या रस्त्याच्या कामावर, घोडीपाडया जवळ बेहेडगांव येथील १८१ रोहयो मजुरांची मे महिन्यात रोजगार हमीवर २ ई- मस्टरे काढून कामे केली आहेत. या रस्त्याच्या साईट पट्टीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. महाराष्ट्र रोजगार हमीवर काम करणाऱ्या रोहयो मजुराला- १८१ रु पये दिवसभराची मजुरी देणे बंधनकारक आहे. रस्त्याचे काम मजुरांच्या अंगावर असल्याने मजुराला त्या मजुरीपेक्षा अधिक मजुरी मिळायला हवी होती. मात्र, रस्त्याच्या साईट पट्टीच्या कामावर मजुराला दिवसभर काम करूनही फक्त ७० ते ८० रुपये दिवसभराची मजुरी मिळाली आहे. त्यामुळे बेहेडगांव येथील रोहयो मजुरांनी एवढे काम करूनही अल्प मजुरी मिळाल्याने सां. बा. विभागावर मजुरांनी नाराजी व्यक्त करीत चौकशीची मागणी केली आहे. रोजगार हमीवरील कामाचे ई- मस्टर काढून मजुरांनी केलेल्या कामाची मजुरी बँकेत किवा पोस्टामध्ये दिली जाते. त्यामुळे सां. बा. विभागाच्या अधिकाऱ्यांनी हात झटकत या मजुरांनी जेवढे काम केले आह तेवढीच मजुरी या मजुरांना मिळाली आहे अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या सायवन, घोडीपाडया जवळ बेहेडपाडा येथील मजुरांनी रस्त्याच्या साईट पट्टीच्या केलेल्या कामाचे माप घेऊन मजुरी देण्यात यावी. विशेष म्हणजे काही मजुरांना मिळालेल्या कामाच्या मजुरीत त्रुटी आढळल्या आहेत यामध्ये काहींना ६० रु पये रोज तर काहींना १२० रु पये रोजंदारी असा फरक आहे. काम तर सारखेच केले आहे त्यामुळे कमी मजुरी मिळालेल्या मजुरांनी नाराजी व्याक्त करीत चौकशीची मागणी केली आहे. (वार्ताहर)