शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

वकील कायद्याच्या मसुद्याची होळी

By admin | Updated: April 24, 2017 23:45 IST

केंद्र सरकारने वकील कायद्यात सुचविलेल्या नविन तरतूदीला तीव्र आक्षेप घेऊन जव्हार तालुक्यातील वकील संघाच्या सदस्यांनी

जव्हार: केंद्र सरकारने वकील कायद्यात सुचविलेल्या नविन तरतूदीला तीव्र आक्षेप घेऊन जव्हार तालुक्यातील वकील संघाच्या सदस्यांनी शुक्रवारी प्रस्तावित मसुद्याची जाहीर होळी केली. येथे न्यायालयाच्या आवारात झालेल्या आंदोलनात वकील संघाचे सदस्य सहभागी झालेले होते.भारतातील सर्व वकीलांच्या संघटनेने जाहिर केल्याप्रमाणे आणि महाराष्ट्र व गोवा बार कौन्सीलच्या निर्देशानुसार जव्हार व इतर तालुक्यातील वकील संघातील सदस्यांनी हे आंदोलन करून नविन कायद्यास आक्षेप घेतला. नव्याने सुचविलेल्या दुरुस्तीनुसार बार कौन्सिलमध्ये केवळ २१ पैकी १० सदस्य वकील असतील व उर्वरित ११ हे बाहेरच्या कार्यक्षेत्राशी संबंधित असलेले सदस्य असतील. म्हणजे ज्यांचा वकिली क्षेत्राशी संबंध नाही अशा सदस्यांचे बहुमत राहिल व ते त्यांच्याप्रमाणे निर्णय लादू शकतील असा वकील संघाचा आक्षेप आहे. शिस्तपालन समितीचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. तिच्यात पाचपैकी दोन सदस्य वकील असतील. या समितीकडे वकीलांच्या कामकाजातील चुकांबद्दल कारवाई करण्याचे अधिकार आहेत. ती दोषी वकिलाला तीन लाखापर्यंत दंड करू शकेल व प्रसंगी वकिलीची सनद रद्द करण्याचा अधिकार तिला असेल अशी तरतूददेखील सुचविण्यात आली आहे. वकीलांच्या भविष्याशी निगडित असलेल्या या तरतूदींमुळे आम्हांला कायद्याचे संरक्षण मिळण्याऐवजी त्यांना अन्यायाला तोंड द्यावे लागेल. अशी भावना व्यक्त करण्यात आली. सरकारचे हे कृत्य निषेधार्थ असून या तरतूदी तातडीने मागे घेउन वकील संघटनांना विश्वासात घेउन दुरूस्ती करावी अशी मागणी जव्हार वकील संघाने केली आहे. या आंदोलनात जव्हार वकील संघाचे सदस्य अ‍ॅड. प्रसन्न वसंत भोईर, अ‍ॅड.जितेंद्र वा. मुकणे, अ‍ॅड.अब्दूल मनियार, अ‍ॅड. रणजित मेतकर, अ‍ॅड.निशांत मुकणे, अ‍ॅड.निलेश पितळे, अ‍ॅड.क्षिरसागर, अ‍ॅड.गणेश आचारी इ. सदस्य सहभागी झाले होते. (वार्ताहर)