शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महापालिकेचे उपविधीच मंजूर झालेले नाहीत, उपविधीशिवाय व्यवसाय कर बेकायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 00:40 IST

Vasai-Virar Municipal Corporation : महापालिकेने उपविधीचा आराखडा तयार केला होता आणि त्याच्या मंजुरीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे २५ लाख रुपये भरलेही होते. मात्र, त्याचा पाठपुरावा झालेला नाही.

- प्रतीक ठाकूर

विरार : वसई-विरार महापालिकेचे उपविधी मंजूर नसताना पालिकेने लागू केलेला व्यवसाय परवाना बेकायदेशीर असल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे पालिकेने उपविधीचा आराखडा तयार करून स्थानिक स्वराज्य संस्थेकडे २५ लाख भरूनही अद्याप उपविधी मंजूर झाले नसल्याचे समोर आले आहे.महापालिकेने उपविधीचा आराखडा तयार केला होता आणि त्याच्या मंजुरीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे २५ लाख रुपये भरलेही होते. मात्र, त्याचा पाठपुरावा झालेला नाही. त्यामुळे अद्याप उपविधी मंजूर झालेले नव्हते. दरम्यान, पालिकेने व्यवसाय परवाना लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महापालिकेच्या ज्या अधिनियमाच्या आधारे व्यवसाय परवाना लागू करण्यात आला आहे, तो मुळात चुकीचा आहे, असे कायदे अभ्यासक निमेश वसा यांचे म्हणणे आहे. अधिनियम ३७६च्या अन्वये सर्वांना अशा परवान्याची गरज नसते, असे कायदेतज्ज्ञ वसा यांनी सांगितले. पालिकेने या नोटिसा १५ दिवसांत मागे घेतल्या नाहीत, तर न्यायालयात जाऊ, असेही त्यांनी सांगितले.पालिकेला शहरातून विविध मार्गांनी उत्पन्न प्राप्त होते. नागरिकांना कर आकारून, विविध शुल्क आकारून हे उत्पन्न मिळविले जाते. मात्र, अधिकाअधिक उत्पन्न वाढविण्यासाठी पालिकेला कायदे बनविणे आवश्यक असते. हे कायदे बनवायचे असतील, तर त्यासाठी उपविधी मंजूर असावे लागतात आणि त्याचे धोरण ठरावे लागते. 

उपविधी नसल्याने परवाने नाहीत- २००९ साली वसई-विरार महापालिकेची स्थापना झाली होती. मात्र, तेव्हापासून उपविधीच मंजूर नव्हते. उपविधी नसल्याने पालिका परवाने देऊ शकते, तसेच दंडात्मक कारवाईही करता येते. - शहरातील मनोरंजनाची ठिकाणे, सिनेमागृह, दुकाने यांना परवाने दिले जाऊ शकतात. त्यातून उत्पन्न मिळू शकते. पालिकेने उपविधी मंजूर केलेले नसल्याने कायदे बनविता येत नाहीत. यामुळे पालिकेला परवाने देता येत नाहीत. 

उपविधीशिवाय परवाना लागू करणे चुकीचे आहे. उपविधीला महासभेने मंजुरी दिली होती. मात्र त्याचा पाठपुरावा प्रशासनाने केला नाही म्हणून उपविधी रखडल्या.- सुदेश चौधरी, माजी स्थायी समिती सभापती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार