शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात कायदा व सुव्यवस्थेची झाली ऐशीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:05 IST

हत्यांमुळे भीतीचे वातावरण : गुन्हेगारी राेखण्यात पाेलिसांना अपयश

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : सहा वर्षांपूर्वी विभाजन झालेल्या तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हेगारीचा आलेख वाढायला लागला आहे. मीरा - भाईंदर - वसई - विरार पोलीस आयुक्तालय होऊनही गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेत नाही. गोळीबार, पोलीस कर्मचाऱ्याची पोलीस ठाण्यातील आत्महत्या, परदेशी नागरिकांचे वास्तव्य, घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहनचोरी यामुळे तुळिंज पोलीस ठाण्याचे नाव नेहमीच चर्चेत असते. त्यातच साेमवारी एका दिवसात झालेल्या दाेन हत्या आणि बुधवारी पतीने पत्नीची केलेली हत्या, यामुळे तुळिंज पाेलीस ठाण्याचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर  आला असून, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पाेलीस अपयशी ठरत असल्याचा आराेप नागरिक करत आहेत. 

सुमारे सहा ते साडेसह लाखांची लोकसंख्या असलेल्या  नालासोपारा पूर्वेत तुळिंज पोलीस ठाणे आहे. या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असल्याने पाेलीस ठाण्यातील मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी वाढत आहे. शहरात पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे, तसेच साधनसामुग्रीची कमतरता आहे. मार्चच्या सुरुवातीलाच  तीन हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नालासोपारा पूर्वेत संख्येश्वर येथे ४५ वर्षीय सुरक्षारक्षकाची तीन आरोपींनी हत्या केली. याच तिघांनी रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकाला चाकूचा धाक दाखवत मारहाण करून लुटले. हत्येच्या आदल्या रात्री तुळिंज पोलिसांनी गस्त घातली असती तर या घटना झाल्या नसत्या, असे नागरिकांचे म्हणणे आहे. मोबाइलसाठी एका २९ वर्षीय रिक्षाचालकाची गर्दुल्याने चाकूने हत्या केली आहे. तुळिंज हद्दीत गर्दुल्यांचे वाढते प्रमाण भविष्यात डोकेदुखी ठरणार आहे. दोन महिन्यांत ५१ घरफोड्याचालू वर्षात म्हणजे १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२१ या दोन महिन्यांत गुन्हेगारीच्या आकडेवारीनुसार तीन हत्या, ३२ जबरी चोरी, ५१ घरफोड्या, ३८ वाहनचोरी, ४७ दुखापत, ११ एनडीपीएस, ८ फसवणूक, १६ दारूबंदी, १३ अपहरणांच्या घटनांची नोंद झाली आहे. 

तुळिंज पोलीस ठाण्यात २३ अधिकारी असून, १३८ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. याच स्टाफच्या प्रत्येकाने इमानेइतबारे काम केले तर गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना नक्कीच यश मिळेल.- राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक, तुळिंज पाेलीस ठाणे