शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण

By admin | Updated: February 5, 2016 02:33 IST

आरोहण संस्था आणि सीमेन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आशा प्रकल्पांतर्गत पतंगशहा ग्रामीण रुग्णालय, जव्हार येथे अद्ययावत सोनोग्राफी मशीन देणगी

हुसेन मेमन, जव्हारआरोहण संस्था आणि सीमेन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आशा प्रकल्पांतर्गत पतंगशहा ग्रामीण रुग्णालय, जव्हार येथे अद्ययावत सोनोग्राफी मशीन देणगी स्वरुपात देण्यात आली.त्याचा लोकार्पण सोहळा जव्हार ग्रामीण रुग्णालयात मोठया थाटात आज संपन्न झाला. सीमेन्स हेल्थकेअर, इंडिया चे सी. एफ. ओ. कृष्णन यांनी केले तर प्रमुख अतिथी पालघर सिव्हील सर्जन डॉ. दिनकर रावखंडे हे होते.जव्हार, मोखाडा व विक्रमगड या तिन्ही तालुक्यातील साधारण साडेचार लाख आदिवासी बहुल अतिदुर्गम तालुक्यांना आरोग्याचा गंभीर प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. कुपोषण, गरोदर मातांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण, शरीरातील गाठी वा अन्य आजार, गरोदर मातांच्या बालकाचे वजन व वाढ याची सोनोग्राफी वेळीच न झाल्याने, वेळीच निदान व उपचार होत नाहीत. त्यामुळे कुपोषित बालकांच्या मृत्यूचे प्रमाण देखील या तालुक्यात जास्त आहे.विक्रमगड व मोखाडा रुग्णालयात सोनोग्राफी मशीनच उपलब्ध नाही जव्हार ग्रामीण रुग्णालयाला दोन मशीन मिळाल्या होत्या परंतु तंत्रज्ञ व देखभाली अभावी त्या बंद होत्या परिणामी या तिन्ही तालुक्यातील गोरगरीब जनतेला निदानासाठी ८० ते ९० कि.मी. दूर असलेल्या नाशिक, ठाणे येथील जिल्हा रुग्णालयात जावे लागत होते. दूरचे अंतर व घाट रस्ता यामुळे अनेकांना वाटेतच आपले प्राण गमवावे लागल्याचा अनेक घटना घडल्या आहेत.मोखाड्याची आरोहण ही आदिवासी भागात काम करणारी संस्था असून तिने आजपर्यंत जवळपास २५०० गरोदर मातांच्या सोनोग्राफी शहराच्या ठिकाणी जावून करवून घेवून त्यांचे प्राण वाचविले. जव्हार सारख्या मध्यवर्ती ठिकाणी सोनोग्राफीची सोय होण्यासाठी त्यांनी शासकीय पातळीवर प्रयत्न देखील केले.त्यात यश न आल्याने आरोहणच्या प्रकल्प अधिकारी श्रद्धा शृंगारपुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिमेन्स लिमिटेड चे सेशन यांच्याशी संपर्क साधून १५ लाख रु.किमतीची अद्ययावत २ डी मशीन मिळवून दिली शिवाय डॉ.तुषार पाटील व डॉ.नारायणकर हे सेवाभावी सोनोलॉजिस्ट व सामाजिक बांधिलकीने आठवड्याच्या दर शनिवारी व बुधवारी सेवा देण्यासाठी जव्हार येथे येणार आहेत.संपूर्ण पालघर जिल्ह्यातील हे एकमेव परिपूर्ण व सुसज्ज असे हे मशीन असणार असल्याची माहिती श्रुंगारपुरे यानी उपस्थिताना दिली. सदर अनावरण प्रसंगी अप्परजिल्हाधिकारी किशोर तायडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामदास म्हराड, माजी नगराध्यक्ष दिनेश भट, जि. प. सदस्य प्रकाश निकम,माजी नगराध्यक्ष राजाराम मुकणे, संस्थेचे कार्यकर्ते व आशा, अंगणवाडी सेविका व तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.