शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

२७ गावे वगळण्याचा अहवाल अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 05:29 IST

रवींद्र चव्हाण यांची माहिती : ग्रोथ सेंटरला विरोध झाल्यास अन्यत्र जाण्याची शक्यता

डोंबिवली : ‘केडीएमसीतून २७ गावे वगळण्यासाठी मागवलेल्या हरकती-सूचनांचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. तो मिळताच मुख्यमंत्री गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय घेणार आहेत’, अशी माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे दिली. ‘आगरी युथ फोरम’ने भरवलेल्या सोळाव्या आगरी महोत्सवाचा समारोप राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, २७ गावे संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, दत्ता वझे, चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ‘हरकती-सूचनांचा अहवाल विचारात न घेता २७ गावे वगळल्यास त्याला न्यायालयात कोणीही आव्हान देऊ शकतो. ही बाब विचारात घेऊन हा निर्णय विचारपूर्वक घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री लवकरच त्याबाबतचा निर्णय घेणार आहेत.’‘२७ गावांतील एक हजार ८९ हेक्टर जागेवर कल्याण ग्रोथ सेंटर उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यासाठी दिलेला एक हजार ८९ कोटींचा निधी पडून आहे. सरकारला ग्रामस्थ व भूमिपुत्रांची जागा घ्यायची नाही. केवळ, त्या जागेवर विकासासाठी परवानगी हवी आहे. या प्रकल्पाद्वारे सेवा क्षेत्रातील ५० हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. २७ गावे परिसरातील भूमिपुत्रांनाही त्यात रोजगाराची संधी मिळेल. सरकारला ग्रोथ सेंटर उभारायचेच आहे. मात्र, त्याला ग्रामस्थांनी विरोध केल्यास ग्रोथ सेंटरचा प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे विकास आणि रोजगाराच्या संधी विरोधामुळे हुकतील, याचा विचार होणे गरजेचे आहे, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.घरनोंदणीसाठी पुन्हा चर्चा करणारच्२७ गावांतील ग्रामपंचायतीने दिलेल्या मंजुरीच्या आधारे भूमिपुत्रांनी इमारती बांधल्या. त्यातील घरे पागडी व भाडेपद्धतीने दिली आहेत. परंतु, तेथील घरनोंदणी सरकारने बंद केली आहे. त्यामुळे त्यांचा रोजगार अडचणीत आला आहे.च्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे चर्चा केली आहे. त्यातून काही निष्पन्न झालेले नसले, तरी पुन्हा चर्चा करून नोंदणी सुरू करण्याची मागणी केली जाईल, असे आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार