शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ जमीन अखेर ठरली गावचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 06:00 IST

बळकाविण्याचा डाव फसला : तलाठी, उपलेखापाल यांना कारणे दाखवा, कारवाई प्रस्तावित

पालघर : माकूणसार येथील गट नंबर १८० मधील सुमारे आठ एकर जमिनीच्या सातबाऱ्यावर तहसील कार्यालयातील उपलेखापाल व तत्कालीन तलाठ्याने सुनील गोकर्ण दुबे यांच्या नावे पीकपाणी चढवून जमीन बळकाविण्याच्या प्रयत्नाविरोधात ग्रामस्थांनी उभारलेल्या लढ्याला यश मिळाले आहे. प्रांताधिकाºयांनी पीकपाणी आदेश रद्द करून दोन्ही महसूल कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

माकूणसार येथील गट नंबर १८० मधील ३.०१.५, पोट खराबा ०.१०.५ हेक्टर आर जमिन गंगाधर ग दांडेकर, विश्वनाथ ग.दांडेकर यांच्या नावावर असून ते दोघेही मयत आहेत. त्यामुळे या जमिनीचा कुणीही हक्क सांगण्यास पुढे येत नसल्याने या भूखंडाच्या आत येणारे खाडीचे पाणी अडवून त्याचा वापर ग्रामस्थ क्रिकेट खेळण्यासाठी अनेक वर्षांपासून करीत होते. परंतु सुनील दुबे यांनी या जमिनीवर माझा हक्क असून महसूल विभागाने वरील भूखंडाच्या सातबाºयावर माझ्या नावाने पीकपाणी चढविले असल्याचे सांगून या जागेवर बांध घालून कंपाउंड घातले होते.

या जमिनीवर मागील २०-२५ वर्षांपासून खाडीचे पाणी शिरून ती नापीक झाल्याने व त्यावर काही महिने ग्रामस्थ क्रि केट खेळत होते. मागील अनेक वर्षांपासून कधीही कुणीही तिथे शेती करीत नसल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे होते, असे असताना अचानक तहसीलदार कार्यालयातील कुळवहीवाट शाखेचे उपलेखापाल व तत्कालीन तलाठी रत्नदीप दळवी यांनी महसूल विभागातील काही उच्चपदस्थ अधिकाºयांच्या आशीर्वादाने त्या जमिनीवर सुनील दुबे यांच्या नावाचे पीकपाणी बेकायदेशीररित्या चढविण्याचा प्रताप केला होता.या प्रकरणात पंचनामे करतांना घेण्यात आलेले साक्षीदारही बोगस होते तर काहींच्या सह्या पूर्व कल्पना न देताच फसवणूकीने घेतल्याचे सत्य या संदर्भातील चौकशीतून समोर आले होते. लोकमतने जे नाही ललाटी, ते लिही तलाठी असे वृत्त प्रसिद्ध करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला. लोकसभा पोट निवडणुकीवर घातलेल्या बहिष्काराची दखल प्रशासनाला घेणे भाग पडले. उपलेखापाल व तत्कालीन तलाठी यांना कर्तव्यायुतीबाबत कारवाई करण्यात यावी असे आदेश दिले.मागील अनेक वर्षां पासून ग्रामस्थांची वहीवाट असलेल्या जमिनीवर महसूल कर्मचाºयांनी चुकीने पीकपाणी लावल्याचे सिद्ध झाल्याने ही जमीन पुन्हा ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावी.- नागेश वर्तक, ग्रामस्थ

टॅग्स :Vasai Virarवसई विरार