शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित जागेवर भूमाफियांचा कब्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 23:31 IST

नागरिक त्रस्त : कचराभूमीसाठी राखीव जागेवर बेकायदा चाळी उभारण्याचा घाट

विरार : कचराभूमीसाठी आरक्षित जमीन भूमाफियांनी काबीज केल्याचा प्रकार वसईत समोर आला आहे. या जमिनीवर आता बेकायदेशीररीत्या चाळी उभारल्या जात आहेत. त्यामुळे आधीच शहरात कचराभूमीच्या जागेची टंचाई भासत असताना आरक्षित जागेवर असे प्रकार सुरु असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

वसई पूर्वेच्या राजिवली भागात सर्व्हेे क्रमांक ११५ ची जमीन कचरा भूमीसाठी आरक्षित आहे. पालिकेने अद्याप ही जागा कचराभूमीसाठी तयार केलेली नाही. मात्र हा भूखंड आता भूमाफियांनी आपल्या कब्जात घेतलेला दिसतो. या जमिनीवर बिल्डरांनी माती टाकून चाळ बांधण्याचे काम हाती घेतले आहे. महापालिकेकडे वसईच्या गोखीवरे येथे एकच कचराभूमी आहे. ती जागाही अपुरी पडत असल्याने पालिकेला टंचाई भेडसावत आहे. त्यामुळे महापालिकेकडे राजिवली भागात कचराभूमीची आरक्षित जागा असतानाही तेथे भूमाफियाकडून बेकायदेशीर चाळी का उभारतात, असा असा उपस्थित होत आहे. महापालिका बिल्डरांवर कारवाई का करत नाही, असा प्रश्न नागरीक करत आहेत.महापालिकेकडून आतापर्यत दोनदा सदर बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली आहे. मात्र तरीही बिल्डर कचरा भूमीच्या जागेवर अतिक्र मण करत आहेत. लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.-सुरेंद्र पाटील, सहाय्यक आयुक्त,वसई-विरार महापालिकाडम्पिंग ग्राउंडवर होत असलेल्या अनधिकृत बांधकामासबंधित प्रकरणावर पालिका अधिकाऱ्याला तक्रारीचे पत्र दिले आहे. जर कारवाई न झाल्यास संबधित अधिकाºयाला निलंबित करण्याची मागणी करणार आहोत.-रमेश घोरकाना,स्थानिक नगरसेवक