शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ समुद्रकिनाऱ्यावर भूमाफियांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 01:06 IST

सीआरझेडमधील सरकारी मोकळ्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या चिंचणीच्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावर भूमाफियांची नजर पडली आहे. गावातील काही व्यक्ती आणि चिंचणी ग्रामपंचायतीमधील एका पदाधिकाऱ्याच्या संगनमताने समुद्रकिनाऱ्यावरील सीआरझेडमधील सरकारी मोकळ्या जमिनीवर अतिक्रमण करून तिची प्रतिगुंठा चार लाख रुपयेप्रमाणे विक्री सुरू असल्याने ग्रामस्थांनी आचर्य व्यक्त केले आहे. याची जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

चिंचणी समुद्रकिनाऱ्यावरील सीआरझेडमध्ये असलेल्या सरकारी जमिनीवर ग्रामपंचायतीमधील एका पदाधिकाऱ्याच्या संगनमताने भूमाफियांनी सरकारी मोकळ्या जागेवर घर न बांधताच त्यावर घरपट्टी आकारून ही जागा हडप करण्यास सुरुवात केली आहे. ही जागा प्रतिगुंठा चार लाख रुपयेप्रमाणे विक्री करून जेसीबीच्या साह्याने या जागेवर धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याच्या नावाखाली खोदकाम सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.विशेष म्हणजे चिंचणी खाडीनाका ते वाणगावनाका दरम्यान रस्त्याला लागून मोठमोठ्या इमारतींची संकुले बांधली जात आहेत. यासाठी कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता केवळ ग्रामपंचायतीच्या परवानगीने या इमारती उभ्या केल्या जात आहेत. यावर महसूल विभागाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

मोकळ्या जागेवर घरपट्टी? डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावरील सीआरझेड परिसरामध्ये असलेल्या सरकारी जमिनीवर ग्रामपंचायतीमधील एका पदाधिकाऱ्याच्या संगनमताने भूमाफियांनी सरकारी मोकळ्या जागेवर घर न बांधताच त्यावर घरपट्टी आकारून ही जागा हडपण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 

चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर अतिक्रमण केल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. या ठिकाणी सरकारी जागेवर अतिक्रमण झालेले नसून तसा प्रकार उघडकीस आल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई केली जाईल.- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू

टॅग्स :Vasai Virarवसई विरार