शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लखोबा लोखंडेचा मीरा रोडमध्ये नवा अवतार : ७ गुन्हे दाखल

By admin | Updated: September 1, 2015 04:22 IST

अपत्य असलेल्या विधवा, घटस्फोटीत व ३५ ते ४० वयाच्या अविवाहित महिलांना गाठून त्यांच्याशी पत्नी व मेव्हण्याच्या प्रयत्नातून विवाह करायचा. अपत्य झाल्यानंतर त्या

भार्इंदर : अपत्य असलेल्या विधवा, घटस्फोटीत व ३५ ते ४० वयाच्या अविवाहित महिलांना गाठून त्यांच्याशी पत्नी व मेव्हण्याच्या प्रयत्नातून विवाह करायचा. अपत्य झाल्यानंतर त्या महिलेला लुटून पोबारा करणाऱ्याच्या रुपाने लखोबा लोखंडेचा मीरारोड व भार्इंदर पूर्वेच्या नवघर परिसरात नवा अवतार थैमान घालत असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघडकीस आले आहे.हा लखोबा लोखंडे, संजय शंकर सगळे, सगळे-पाटील, संजय शंकर सांगळे, संजय शंकर पाटील, अविनाश शंकर पाटील, मनोहर शंकर पाटील, मनोहर शंकर शेळके, अजित आर्या आदी नावे धारण करून महिलांना हेरतो. त्यांच्यासोबत विवाह करण्याचा प्रस्ताव सादर करण्यासाठी तो आपल्या खऱ्या पत्नीला आपली बहिण बनवून तिच्या भावाच्या सहकार्याने पिडीत महिलांच्या नातेवाईकांना गाठतो. हे दोघे हा लखोबा इंजिनियर, वकील किंवा प्राध्यापक असल्याचे भासवून त्यांचा विवाह लावून देतात. विवाहानंतर तो अपत्य होईपर्यंत त्या महिलांसोबत वास्तव्य करतो. त्यादरम्यान तो त्यांच्याकडून रक्कमेसह दागिने हडपतो. अपत्य झाल्यानंतर तो काही दिवसांतच त्या महिलांना सोडून अन्यत्र पळ काढून आपले लखोबाकांड सुरु ठेवतो. या लखोबाचे मुख्य कुटुंब भार्इंदर पूर्वेच्या नवघर परिसरात राहत असून त्याच्या दोन मुली त्याच परिसरातील एका महाविद्यालयात शिकत आहेत. या घटनांतील विशेष बाब म्हणजे तो लुटलेला मुद्देमाल आपल्या जवळ ठेवत नाही. त्यातून घेतलेली मालमत्ता आपल्या नावे करीत नाही. परंतु, त्याच्या सिन्नर तालुक्यातील दोडी गावात शेतजमीन व अन्य मालमत्ता असून त्या वडीलांच्या नावे आहेत.या लखोबाचे दुष्यकृत्य अहमदनगर पोलिसांत एका पिडीत महिला वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीमुळे चव्हाट्यावर आले असून आतापर्यंत अहमदनगरमध्ये एका शिक्षिकेसह ४ तर कोल्हापूरमध्ये एका महिला पोलीसासह शिक्षिका, वकील असे तीन असे एकूण सात गुन्हे दाखल झालेले आहेत. अहमदनगर गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक राहुल गायकवाड यांनी सांगितले. (वार्ताहर)