पालघर : ठाणे जिल्हा मजूर कामगार सहकारी संघाच्या संचालकपदाची निवडणूक १९ जुलै रोजी होत असून अनेक लखपती, करोडपती स्वत:ला मजूर म्हणवून घेत या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. पालघर व ठाणे जिल्ह्यातील ६१६ मजूर संस्था या निवडणुकीत मतदान करणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, ठाणे, उल्हासनगर, कल्याण, तालुक्यातून प्रत्येकी दोन तर वाडा अंबरनाथ, मुरबाड, तालुक्यातून प्रत्येक एक तसेच पालघर, डहाणू, वसई तालुका मिळून एक, जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुका मिळून एक व अनुसूचित जाती/जमाती इतर मागासवर्गीय, सर्वसाधारण, भटके विमुक्त प्रवर्गामधून प्रत्येकी एक तर महिलांमधून दोन संचालक निवडले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तसेच छाननी साठी हे तथाकथीत मजूर आपापल्या अलिशान गाडीने जिल्ह्यातील कार्यालयात पोहचले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही ही सर्व मंडळी मुख्यालयात गेल्याचे समजते. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा उपनिबंधकानी घेतल्याचे समजत असून ते यावर काय कारवाई करतात हे लवकरच दिसून येईल. (वार्ताहर)
मजूर संघाची निवडणूक १९ जुलैला
By admin | Updated: July 9, 2015 23:17 IST