शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

कुडूसला पावसाने झोडपले

By admin | Updated: October 15, 2015 01:32 IST

वादळ व वीजांच्या कडकडाटासह मंगळवारी संध्याकाळी कोसळलेल्या पावसाने कुडूस परिसराला अक्षरश: झोडपून काढले. या वादळात अनेक घरांची छपरे उडाली तर विजेचे खांब तसेच झाडे उन्मळून पडलीत

वाडा : वादळ व वीजांच्या कडकडाटासह मंगळवारी संध्याकाळी कोसळलेल्या पावसाने कुडूस परिसराला अक्षरश: झोडपून काढले. या वादळात अनेक घरांची छपरे उडाली तर विजेचे खांब तसेच झाडे उन्मळून पडलीत. या पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर पाऊस सुरू झाल्यापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले. चिंचघर, मांगाठणे, नारे, या गावांतही काल वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाल्याने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. महावितरणचे जवळपास १० विजेचे खांब पडले. त्यामुळे परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. तो सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बुधवारी रात्रीपर्यंत वीजपुरवठा सुरू होईल, असे कनिष्ठ अभियंता कांबळे यांनी सांगितले.कुडूस गावातील रजिवान सुसे यांच्या १६ खोल्यांची छपरे पूर्णपणे उडाल्याने तेथे राहणाऱ्या नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. यात बिस्मिल्ला मिर्झा यांच्या पाठीवर पत्रा पडून ते जखमी झाले आहे. रजिवान सुसे यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, याच गावातील रामदास जाधव यांच्या पाच खोल्यांचे पत्रे पूर्णपणे उडाल्याने त्यांचेही बरेच नुकसान झाले आहे. मांगाठणे येथील विजय पाटील यांच्याही घराचे छप्पर उडाल्याने त्यांच्यावरही बेघर होण्याची वेळ आली आहे. यात त्यांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे व्हावेत व त्यांना सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. (वार्ताहर)