शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

कुडूस-गौरापूरचा रस्ता दर्जाहीन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 03:06 IST

सर्वाधिक वर्दळीचा असणारा कुडूस-चिंचघर-गौरापूर या रस्त्याचे काम कासवाच्या गतीने सुरू असून या कामात नियमानुसार साहित्य वापरले जात नसल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप कुणबी सेनेने केला आहे.

- वसंत भोईरवाडा : तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा असणारा कुडूस-चिंचघर-गौरापूर या रस्त्याचे काम कासवाच्या गतीने सुरू असून या कामात नियमानुसार साहित्य वापरले जात नसल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप कुणबी सेनेने केला आहे. अत्यंत महत्वाच्या सध्या व वाहतूक कोंंडी च्या बनलेल्या या रस्त्याचे बोगस काम कारणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी एका निवेदनाव्दारे तहसिलदार दिनेश कुºहाडे यांच्याकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी चालढकल झाल्याच २० मार्च रोजी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.कुडूस-चिंचघर-गौरापूर हा १२ किमी लांबीचा रस्ता असून त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ९ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून हे काम सांगले कंस्ट्रक्शन नाशिक यांना देण्यात आले आहे. परंतु या ठेकेदार एजन्सीने हे काम वाडयातील दोन सब ठेकेदारांन दिले आहे. त्यातून कुडूस ते चिंचघर पर्यंतचा रस्ता क्राँक्रीटकरण तर चिंचघर ते गौरापूर पर्यंतचा रस्ता डांबरीकरण होणार आहे.ते काम सध्या सुरू असून त्यासाठी वापरले जाणारे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा कुणबी सेनेच्या पदाधिकाºयांचा आरोप आहे. या रस्त्यावर लॅब असणे आवश्यक आहे. ती कुठेच दिसत नाही. मुरूम चाळण्या घेतल्या जात नाहीत. मोºयांसाठी वापरले जाणाºया पाईपाला दोन्ही बाजुंनी केसिंग करून पाईप टाकला पाहिजे परंतु तसे होत नाही. त्यामुळे रस्त्यावर दाब आल्यावर पाईप फूटण्याची शक्यता आहे.पाईप अंथरण्यापूर्वी क्राँक्रीट झाले पाहिजे ते ठरलेल्या जाडीचे होत नाही. जे खडीकरण केले आहे ते बरोबर दाबले गेले नसल्याने रस्ता उखडला जात आहे. झालेल्या मोºयांवर कुठेही पाणी मारलेले दिसत नाही. ओल्या कामांवर गोणपाट अंथरणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी ते दिसत नाही. गिरीट पावडर वापराला निर्बंध असतांना खुलेआम गिरीट पाववडर वापरली जात आहे. एकंदर अंदाज पत्रकानुसार काम केले जात नसल्याचा आरोप कुणबी सेनेने केला आहे.हर्षद गंधे म्हणतात, काम अपूर्ण मात्र दर्जा उत्तमया संदर्भात ठेकेदार हर्षद गंधे यांच्यासाठी संपर्क साधला असता कामाचा दर्जा उत्तम असून अजून काम पूर्णच झाले नसल्याने दर्जा बाबत प्रश्नच उपस्थित केला जाऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर स्थापत्य सहाय्यक अभियंता पृथ्वीराज जगदाळे यांच्याशी संपर्क साधला असता या कामाला नागरिकांच्या विरोधामुळे विलंब होत आहे. मात्र, काम नियमाप्रमाणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.>कोंढला-खैर रस्त्याचे : साडेचार कोटी पाण्यातयाच ठेकेदाराने कोंढला-खैरे या रस्त्याचे काम मे महिन्यात केले होते तो रस्ता जून मध्ये पूर्णपणे उखडला गेल्याने शासनाचे ४ कोटी ३५ लाख पाण्यात गेले आहेत. ते ही काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील होते. त्याकामात शाखा अभियंता विनोद घोलप हे पार्टनर असल्याचे बोलले जात होते. याही कामात ते ठेकेदारांसोबत असल्याने याही रस्त्याचा पूरता बोजवारा उडाला आहे. या प्रकरणी उपोषण करण्याचा इशारा कुणबी सेनेचे उपतालुका प्रमुख प्रदिप हरड यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. त्याच्या प्रती अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी यांना माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.