शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोपरफाटा उड्डाणपुलाचे काम सुरू

By admin | Updated: February 12, 2017 02:57 IST

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बहुप्रतिक्षित कोपर फाटा येथे महामार्गावरील उड्डाण पूलाच्या कामाला सुरवात झाली असून सर्व्हिस रोडचेही काम चालू झाले आहे.

पारोळ : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बहुप्रतिक्षित कोपर फाटा येथे महामार्गावरील उड्डाण पूलाच्या कामाला सुरवात झाली असून सर्व्हिस रोडचेही काम चालू झाले आहे. यामुळे काशीद कोपर परिसरातील गावे व पाड्या वस्त्यांतून समाधान व्यक्त होत आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गाव, पाडे व वस्त्यांमधील महामार्गाच्या प्रवासावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, रु ग्ण, कामगार व नागरिकांना महामार्ग ओलांडावा लागतो. त्याचे सहा पदरीकरण झाल्यापासून त्यावरून भरधाव धावणाऱ्या वाहनांची संख्या अनेक पटीने वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन तो ओलांडावा लागतो. आजपर्यंत महामार्ग ओलांडताना शेकडो बळी गेले असून हजारोंना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यासाठी प्राधिकरणाने महामार्गावर उड्डाण पूल निर्माण केले आहेत. मात्र अजूनही काही रहदारीच्या ठिकाणी उड्डाण पूल होणे बाकी आहेत . त्यापैकीच हा पूल होता. तो व्हावा अशी मागणी महामार्गाचे रूंदीकरण काम सुरु झाल्यापासूनची होती. अनेक वर्ष बहुप्रतिक्षेत राहिलेल्या या मागणीची लवकरच पूर्तता होणार असून येथे सर्व्हिस रोड बनविण्याच्या कामालाही सुरवात झाली आहे. या ठिकाणी उड्डाणपुल व्हावा ही मागणी गावाकऱ्यांनी केली होती त्या मागणीला आता यश आल्याचे सेनेचे मिलिंद किणी यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)