शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

वसईत सनसिटी मैदानावर पतंग महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 05:27 IST

संक्रांतीचे खास आकर्षण : मोदींच्या बुलेट ट्रेनचा पतंग अवघ्या सात रुपयाला

वसई : येथील सनसिटी मैदानावर यंग स्टार ट्रस्ट तर्फे रविवारी १३ जानेवारीला पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मकर संक्र ांतीच्या दिवसाची वाट खरतर पतंगबाजीची मौज लुटण्यासाठी सर्वाधिक पाहिली जाते. पतंग उडवण्यापेक्षा पेंच लढवण्याची मजा काही औरच असते. यानिमित्त शौकिनांसाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आमदार हितेंद्र ठाकूर अध्यक्ष असलेल्या यंग स्टार ट्रस्ट विरार यांच्यावतीने तसेच गुजराती परिवार व वसई जेष्ठ नागरीक संघ यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ३ वाजल्यापासून या महोत्सवास सुरूवात होणार आहे. यावेळी आकर्षक बक्षिसे विजेत्यांना देण्यात येणार आहेत. अभिनव पतंग व पेच लढविणाऱ्यांना विशेष बक्षिसे दिली जाणार आहेत.

मकरसंक्र ांत जवळ आल्याने सध्या सर्वत्र पतंगांची धूम दिसत आहे. वेगवेगळे पतंग बाजारात विक्र ीसाठी दाखल झाले असून पाच रूपयांपासून ते तीनशे रूपयांपर्यंतचे पतंग बाजारात उपलब्ध आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी असलेल्या मोदिंजीकी बुलेट ट्रेन व किप इंडिया क्लिन या नावाचे पतंग मोठ्या प्रमाणात विक्र ीसाठी आलेले आहेत. या पतंगांची किंमत सात रूपये आहे. पतंग विक्री करणारेही मोदी की बुलेट ट्रेन सात रूपये मे असे ओरडून ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. १५० रूपयांपासून ७०० रु पयांपर्यंत मांजा भरलेल्या फिरक्याही विक्री करण्यासाठी उपलब्ध आहेत. पतंगाची मोठी बाजारपेठ असलेल्या अहमदाबाद येथून आठवडाभर आगोदर पतंग विक्र ीसाठी आणत असल्याचे वसई पूर्व वाघरीपाडा येथील गोपाळ या पतंग विक्रेत्याने सांगितले. या विक्रीतून लाखोंची उलाढाल होते.वसईत ठिकठिकाणी पतंगविक्र ीचे स्टॉल लागले आहेत. त्यात विविध पतंग पहायला मिळत आहेत. दोन, पाच रूपयांपासून ते अडीचशे, तीनशे रूपयांपर्यंतचे पतंग असून ते घेण्यासाठी गर्दी होत आहेत. वेगवेगळ्या आकार, रंगांमध्ये तसेच स्टाईलमध्ये पतंग आहेत. हिरॉईन्सचे फोटो असलेले, संदेश असलेले पतंगही दिसत असून १० ते ५० रूपयांपर्यंतच्या पंतंगांना जास्त मागणी आहे. तर महागडे पतंग काही ठराविक लोकच विकत घेत आहेत. अनेक लोक रात्रीच्या वेळेस पतंगांना छोटे कंदील बांधून ते आकाशात उडवतात. असे छोटे कंदीलही विक्री होत आहेत. पतंगांची विक्र ी मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यावर विक्र ेत्यांना या सीझनमध्ये मोठा फायदा होतो. पतंग उडविण्याची स्पर्धा आत्तापासूनच लागली आहे.पतंगाचा मांजा घेतोय पक्षांचा जीव.च्एकीकडे बच्चे कंपनी, तरूणाई पतंग उडवून काटाकाटीच्या तयारीत आहेत तर मांजामुळे पक्षी जखमी होत असल्याने प्राणी मित्रांनी पतंग उडवू नये, याबाबत जनजागृती चालवली आहे.च्पतंग उडवितांना मांज्यामुळे पक्षी जखमी होतात. निष्पाप प्राण्यांचे जीवही त्यात जातात. त्यामुळे गेले तीन-चार वर्ष वसई पट्ट्यात मकरसंक्र ांतींचे दोन दिवस जखमी पक्षांवर उपचार करण्यासाठी शिबीर ठेवले जाते. पक्षांवर दया करा, असे सांगणारे एसएमएस आत्तापासून पाठवले जात आहेत.पतंग आणि लाडूंची आॅनलाइन खरेदी.होलसेल बाजारात उपलब्ध असणाºया पतंग आणि फिरक्यांपेक्षा आॅनलाइन वेबसाइटसवर त्यांच्या किमती अधिक आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. पतंगदोरी, डी कॅथलॉन, अमेझॉन, हायफाय काईट्स या साइटसवर पतंगोत्सव भरला आहे. दिवाळीत विविध पदार्थांचे जसे आॅनलाइन शॉपिंग झाले तसेच मकर संक्रांतीसाठी तिळाचे लाडू आणि तिळाच्या वड्या आॅनलाइन शॉपिंग साइटसवर उपलब्ध आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार