शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

तीनवर्षीय बालिकेचे अपहरण, बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 23:57 IST

माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य 

लोकमत न्यूज नेटवर्क तलासरी : तलासरीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. येथील आईच्या कुशीत झोपलेल्या तीनवर्षीय आदिवासी बालिकेचे शुक्रवारी रात्री बारा-साडेबारा वाजेच्या दरम्यान अपहरण करण्यात येऊन घराजवळच्या शेतात नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याबाबत तलासरी पोलीस स्टेशनला अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येऊन तीन इसमांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. तर, गंभीर जखमी बालिकेवर डहाणू येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडित तीनवर्षीय बालिका आपल्या आईबरोबर घराच्या ओट्यावर शुक्रवारी रात्री झोपली होती. रात्री बारा-साडेबाराच्या सुमारास बालिका व तिची आई गाढ झोपेत असताना अज्ञात नराधम पीडित मुलीला उचलून घेऊन गेला. आपली मुलगी कोणीतरी उचलून नेली, हे लक्षात येताच तिने घरच्यांना जागे केले व मुलीचा शोध घेतला. घराजवळ मुलगी न आढळल्याने बाजूच्या शेतात पाहणी केली असता घरापासून तीन शेत दूर मुलगी रडताना व वेदनेने विव्हळताना आढळली. वेदनेने विव्हळणारी व रक्तस्राव होत असलेली आपली मुलगी दिसताच तिच्याबरोबर अनुचित घटना घडल्याचे समजून तिला तत्काळ तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, ग्रामीण रुग्णालयात स्त्री वैद्यकीय अधिकारी नसल्याने व मुलीची गंभीर परिस्थिती पाहता तिला डहाणू येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

तीन संशयित ताब्याततलासरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास करून तीन संशयित इसमांना ताब्यात घेतले आहे. तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय वसावे स्वतः या घटनेचा तपास करीत असून गुन्ह्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. झालेल्या घटनेचा जनवादी महिला संघटनेने निषेध व्यक्त केला असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कार