शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
2
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
3
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
4
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
5
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
7
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
8
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
9
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
10
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
11
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
12
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
13
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
14
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
15
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
16
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
17
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
18
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
19
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
20
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 

खारघर पथकर नाक्याचा पत्ता कट?

By admin | Updated: July 20, 2014 23:08 IST

पनवेल - सायन महामार्गावरील खारघर टोलनाका सुरु होण्याच्या अगोदरच बंद करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पनवेल : पनवेल - सायन महामार्गावरील खारघर टोलनाका सुरु होण्याच्या अगोदरच बंद करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणाकरिता आलेल्या बाराशे कोटी रुपये खर्चाचा भार सिडकोने उचलण्याची तयारी दर्शवली आहे. तसे संकेत सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी शुक्रवारी पनवेल येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात दिले. गणपतीपूर्वी यावर धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.मुंबई ते पुणे येथे जलद गतीने पोहचता यावे याकरिता मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग तयार करण्यात आला. ताशी ८० कि.मी.ची मर्यादा ठरवून दिलेला हा महामार्ग कळंबोलीपासून सुरु होतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याचे पाहून त्यांचे रुंदीकरण करण्याचे काम दोन वर्षापूर्वी हाती घेण्यात आले. बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वानुसार हा महामार्ग दहा पदरी करण्यात आला असून २३ कि.मी. अंतरावर काही ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. या महिन्याच्या सुुरुवातीला हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी अद्याप अनेक कामे बाकी राहिलेले आहेत. असे असताना फक्त टोल वसूल करण्याची घाई म्हणून काम पूर्ण झाल्याचा आव संबंधीत ठेकेदाराने आणला. खारघर या ठिकाणी टोल नाका उभारण्याचे काम सुुरु असून या टोलनाक्याला स्थानिक आमदार या नात्याने आ. प्रशांत ठाकूर यांनी कडाडून विरोध दर्शवला. त्याचबरोबर स्थानिकांना यामधून सूट देण्यासाठी त्यांनी ११ जुलै रोजी रास्ता रोको आंदोलनसुध्दा केले. या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुसऱ्या दिवशी बैठक बोलवली आणि आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. वाशी टोल नाका १५ कि.मी. अंतरावर असताना खारघर येथे नियमाने पथकर वसुल करताच कशा येऊ शकतो असा सवाल माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनीही हा टोल नाका चुकीचा असल्याची कबुली दिली. संबंधीत ठेकेदाराला त्याच्या पैशाचा परतावा करुन हा महामार्ग टोलमुक्त करण्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यानुसार या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली. बैठकीत कामगार नेते महेंद्र घरत यांनी परतावा करण्यासाठी सिडकोवर जबाबदारी देण्याचा प्रस्ताव मांडला. याला ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनीही दुजोरा दिला. (वार्ताहर)