शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

वैभवने घेतले होते कराटेचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 03:15 IST

आठ गावठी बॉम्ब आणि स्फोटकांच्या प्रचंड साठ्यासह पकडण्यात आलेला वैभव राऊत कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे. त्याने दोन वर्षांपूर्वी कराटे, भालाबाजी याचे प्रशिक्षणही घेतले असल्याची माहिती सूत्राकडून समोर आली आहे.

पारोळ : आठ गावठी बॉम्ब आणि स्फोटकांच्या प्रचंड साठ्यासह पकडण्यात आलेला वैभव राऊत कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे. त्याने दोन वर्षांपूर्वी कराटे, भालाबाजी याचे प्रशिक्षणही घेतले असल्याची माहिती सूत्राकडून समोर आली आहेवैभव राऊत (४०) हा मूळचा नालासोपारा पश्चिमेतील भंडार आळी येथे राहणारा आहे. त्याला १ मुलगा आणि १ मुलगी आहे. त्याचा इस्टेट एजंटचा व्यवसाय आहे. वैभवचे शिक्षण बारावीपर्यंत पूर्ण झालेले असून महाविद्यालयीन शिक्षण त्याने अर्धवट सोडले असल्याचे समजते .गेल्या सहा वर्षांपासून तो सनातन संस्थेच्या विचारधारेशी जोडला गेला असल्याची माहिती मिळते. तसेच त्याने गोरक्षा ही सामाजिक चळवळ सक्रीयपणे चालवली आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीच्या या तरुणाच्या अटकेचे पडसाद नालासोपाऱ्यात उमटले आहेत.पालघर जिल्ह्यात प्रथमच एटीएसने कारवाई करून सनातन संस्थेच्या एका साधकाला ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. हा साधक कथितरित्या बॉम्ब तयार करीत होता. त्याच्याकडे मिळालेल्या गावठी बॉम्ब व ते बनविण्याच्या सामग्रीमुळे आता एटीएसचे लक्ष पालघर जिल्ह्याकडे लागून राहिले आहे. यातून अनेक घटनांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तिवण्यात येत आ़हे.स्थानिक पोलिसांना एटीएसने ठेवले अंधारातऐन बकरी ईद च्या दिवशी घातपात करण्याचा त्यांचा कट असावा असा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. नालासोपारयातील वैभव राऊतच्या घरी गुरु वारी रात्री एटीएसने अतिशय गोपनीयतेने धाड टाकली होती. याबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती. एवढा भयानक कारभार होत असून त्याची गंधवार्ताही ना पोलिसांना होती ना स्थानिकांना होती, हे कसे? घडले. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या