शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कामगार भाजल्याचा प्रकार १५ दिवस दडपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:20 IST

कंपनीत कामावर असतांना व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे कामगाराच्या अंगावर अ‍ॅसिड पडून तो गंभीररीत्या जखमी झाल्याची घडली आहे.

राहुल वाडेकर । विक्रमगड : कंपनीत कामावर असतांना व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे कामगाराच्या अंगावर अ‍ॅसिड पडून तो गंभीररीत्या जखमी झाल्याची घडली आहे. यामधुन तो कामगार सुदैवाने बचावला असून त्याच्यावर बोईसर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु  आहेत. रविवारी या घटनेस दोन आठवड्याचा कालावधी लोटला अतानाही  कंपनी व्यवस्थापनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिस व प्रशासनापासून दडवुन ठेवली  जात असल्याचा धक्कादायक प्रकार देखील  येथे उघडकीस आला आहे. त्यामुळे या कंपनीची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शेलपाडा वासियांनी केली आहे. तुषार ढोणे (२७) असे या अ‍ॅसिड आंगावर पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव असून तो विक्र मगड तालुक्यातील शेलपाडा येथील रहिवासी आहे. तालुक्यातील आलोंडे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेली इस्टिम इंडस्ट्रीज प्रा.ली ही केमिकल कंपनी असून दि.१७ जुलै २०१७ रोजी तुषार रात्रपाळीला असताना रात्री १२.३० ते १.३० वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या प्लांटमध्ये असिडचे नमूने घेतांना तो पाईपचा वॉल्व उघडण्यास गेला असता तो पुर्ण निघाला त्यात तो पडल्याने त्याचे हात व पाय भाजून त्यास गंभीर जखमा झाल्या आहेत.अपघातानंतर त्यास वाडा येथील खाजगी रुग्णालयामध्ये प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, जखमा जास्त असल्याने  त्यास पुढील उपचारासाठी बोईसर येथील खाजगी रुग्णालयात मध्ये दाखल करण्यात आले आहे. बाईसरच्या खाजगी रुग्णालयाकडून या प्रकरणी तात्काळ बोईसर पोलिस स्टेशनला कळविण्यात आले. त्यानंतर पोलिस जबाबासाठी रुग्णालयात येथे गेले परंतु घडलेल्या प्रकरणाबाबत बोईसर पोलिस स्टेशन येथून नोंदीची खात्री करण्यासाठी संपर्क केला असता पालिसांकडून अद्याप पर्यंत नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अपघाताबाबत इस्टिम कंपनीने पोलिस स्टेशनला माहिती न दिल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.