शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार बस स्थानकाच्या दुरुस्तीला सुरुवात

By admin | Updated: September 10, 2015 23:49 IST

येथील बसस्थानकाच्या इमारती चे बांधकाम हे फार वर्षापूर्वी करण्यात आले होते. अत्यंत जीर्ण झालेल्या या स्थानकाची दुरावस्था झाल्यामुळे आसन व्यवस्थेची दुरावस्था होती, छताचे पत्रे

जव्हार : येथील बसस्थानकाच्या इमारती चे बांधकाम हे फार वर्षापूर्वी करण्यात आले होते. अत्यंत जीर्ण झालेल्या या स्थानकाची दुरावस्था झाल्यामुळे आसन व्यवस्थेची दुरावस्था होती, छताचे पत्रे कित्येक वर्ष बदलले नसल्यामुळे ते अनेक ठिकाणी फुटलेले होते, भिंती कधीही कोसळतील अशा होत्या, वाहतूक नियंत्रण कक्ष, स्थानक प्रमुख व कार्यालयीन कक्ष त्यातच कार्यरत होते. त्यामुळे प्रवासी व कर्मचाऱ्यांत प्रचंड असंतोष होता. जव्हार प्रवासी संघटनेने वेळोवेळी पालघर विभागातील तत्कालीन विभाग नियंत्रक यांच्याकडे बसस्थानकाच्या तात्काळ दुरूस्तीबाबत पाठपुरावा केला.पालघरचे विभाग नियंत्रक मोरे यांनी आॅगस्ट महिन्यात बांधकाम अभियंत्यांसह या बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानक प्रमुख व्ही. जी. रांगसे यांच्याकडून दररोज असणाऱ्या प्रवाशांची सरासरी माहिती घेतली. डहाणू, पालघर, विक्रमगड येथील प्रवाशांना नाशिक अथवा सिल्व्हासा येथे जाण्यासाठी व मोखाडा, खोडाळा व परिसरातल्या प्रवाशांना ठाणे, मुंबई, पालघर, डहाणू येथे जाण्यासाठी या मार्गेच जावे लागत असल्यामुळे या स्थानकात नेहमीच गर्दी असते. हे लक्षात येताच मोरे यांनी १५ दिवसात पहिल्या टप्प्याची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे दि. ९ सप्टें. रोजी लोखंडी शेड, पुढील पत्रे बदलणे व अत्यावश्यक कामाचा शुभारंभ स्थानक प्रमुख रांगसे, कामगार संघटना सचिव एच. जी. भोये, ठेकेदार अनिल तामोरे व मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.