शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूबाबत जव्हार न.प.चे हातावर हात

By admin | Updated: February 4, 2017 02:47 IST

नगर परिषद कार्यक्षेत्रांत डेंग्यूचे संशयीत रूग्ण आढळून येत असल्याचे पत्र कुटीर रूग्णालयाने दिल्यानंतरही पालिका प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेली

जव्हार : नगर परिषद कार्यक्षेत्रांत डेंग्यूचे संशयीत रूग्ण आढळून येत असल्याचे पत्र कुटीर रूग्णालयाने दिल्यानंतरही पालिका प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. घराच्या आजूबाजूला साठलेल्या पाण्यात या डासाच्या आळ्या वाढत असल्याने पालिकेकडून जनजागृतीची मोहिम हाती घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.वैद्यकिय अधिक्षक डॉ. रामदास मराड यांनी दि. १७ डिसेंबर रोजी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन डेंग्युचे नवापाडा येथे १ रूग्ण व डॅम आळी येथे २ रूग्ण आढल्यामुळे उपाय योजना करण्याचे सुचविले होते, मात्र पालिकेने या गंभीर आजारावर कुठलीही उपाय योजना केलेली नाही. जव्हार नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये धूर फवारणीची मागणी होत असून सायंकाळच्या वेळी ती झाल्यास हिवतापाच्या (मलेरिया) मच्छरांना त्यामुळे पायबंद बसतो. डेंग्यूच्या डासांचा हल्ला साधारण पहाटे व सकाळच्या वेळी असतो. मात्र, त्याला काही शास्त्रीय आधार नाही. एकंदर त्यासाठी फक्त नागरिकांमध्ये जनजागृती करुन रहिवाशीभागांमध्ये उघड्यावर टाकलेले शहाळ, टायर, बाटल्या, पाण्याने भरलेल्या व वापरात नसलेल्या टाक्यांतील पाण्यात डेंग्यूच्या डासांची वाढ होते. त्यामुळे पाणी बदलणे तसेच स्वच्छता हाच त्यावरील उपाय आहे असे, जव्हारचे मुख्याधिकारी वैभव विधाते यांनी लोकमतला दिली. (वार्ताहर)आम्ही कुटीर रूग्णालयाने कळविलेल्या रूग्णांच्या घरी जाऊन लिक्विड फवारणी केली आहे. यापूर्वीही आम्ही दवंडी दिली होती व पत्रकेही वाटली होती. तसेच आम्ही शुक्रवारपासून पुन्हा दवंडी देणार आहोत. - वैभव विधाते, मुख्याधिकारी, जव्हार नगर परिषद, जव्हार