शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारला होणार बोटींगची सुविधा आणि उद्यानात धावणार टॉय ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 22:55 IST

शहर कचरामुक्त व स्टार रेटींग ३ ला मंजुरी । २.५० कोटी निधी मंजूर

हुसेन मेमनजव्हार : नगर परिषदेची सर्वधारण सभा शनिवारी राजीव गांधी क्र ीडा संकुल, जव्हार येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. येथील सूर्यतलाव येथे पर्यटकांना बोटींग करण्यासाठी मान्यता देण्याचा विषय मांडण्यात आला त्याला सभेने मंजुरी दिली, तसेच सनसेट पॉइंट येथे लहान मुलांसाठी टॉय-ट्रेन ची उभारणी, तलाठी कार्यालया शेजारील गार्डन विकसीत करणे, जुन्या राजवाड्यामधील गणेश हॉलचे नूतनीकरण करणे, जुना राजवाडा ईमारत संर्वधन करण्यासाठी उपाययोजना करणे, जुना राजवाडा येथे आदिवासी सुष्टी उभारणेस ऐतीहासीक पद्धतीचा बांधकामासाठी विशेष प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करणे, हनुमान पॉँईट, सनसेट पॉंईंट, गांधी चौक, सिल्व्हास रोड नाका, सूर्यतलाव, राजीव गांधी क्र ीडा संकुल तसेच विजय स्तंभ इत्यादी ठिकाणी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणे अशा विविध कामांना मंजुरी देण्यात आली.

महाराष्टतील स्वच्छ सर्व्हेक्षण योजनेत प्राविण्य मिळविलेल्या महानगरपालिका/ नगरपरिषद यांचा अभ्यास दौर करण्याकरीता इंदोर, शिरपूर, लोणावळा, माथेरान इत्यादी शहरांचा अभ्यास दौरा करण्याची सूचना नगरसेवकांनी केल्या, तसेच हागणदारी मुक्ती अंतर्गत विविध पर्यटन स्थळांना सुशोभिकरण करणे यात सनसेट पॉइंट येथे काही ठिकाणी सुशोभिकरण करण्याबाबात विरोधी पक्ष नेते दिपक कांगणे यांनी सूचना दिल्या, तसेच शहरात शौचालय दुरूस्ती करण्यात यावी याकरीता नगरसेवक स्वप्नील औसरकर यांनी सूचना केल्या.सनसेट पॉँइट येथील डम्पिंग ग्राऊंड स्थलांतरीत झाल्यानंतर तेथे बगीचा तयार करणे व उत्पन्नाच्या दृष्टीने विकासात्मक कामे करणे यावर नगरसेवक दिपक कांगणे यांनी वेंगुर्ला येथे डंपींग ग्राऊड हटविल्यानंतर त्या जागेत धाबा व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा भाडे तत्वावर देण्यात आली, जव्हारला ही असे करता येईल असे सुचिवले.

स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत जव्हार शहर कचरामुक्त व शहर स्टार रेटींग क्रमांक ३ घोषीत करण्याबाबत निर्णय घ्यावा असा विषय मांडण्यात आला यावर मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांनी शासनाने २.५० कोटी रूपयांची प्रथम तरतूद केली आहे, शहर कचरामुक्त केल्यानंतर पुन्हा २.५० कोटी येतील त्यामुळे यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून जव्हार शहर कचरामुक्त करता येईल, याला सर्व नगरसेवकांनी दुजोरा दिला, तसेच नगर परिषदेचा मैला टॅÑक्टर खराब झाला असुन येथे नविन व्हॅक्युम व्हॅन खरेदी करावी असे नगरसेवक कुणाल उदावंत यांनी सूचविले. तसेच शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असुन याकरीता औषध फवारणी वेळोवळी करण्यात यावी अशी सूचना नगरसेवक संकेत माळगावी यांनी दिली. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारvasai-acवसई