शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार: राष्ट्रवादीचा भरपाईसाठी ठिय्या

By admin | Updated: May 28, 2016 02:18 IST

तालुक्यातील राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा यांच्या अध्यक्षतेखाली येथील शिवनेरी गार्डन धाब्यासमोर गुरुवारी सकाळी ८.०० वा. पासून रास्ता रोका करण्यात आला.

जव्हार : तालुक्यातील राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा यांच्या अध्यक्षतेखाली येथील शिवनेरी गार्डन धाब्यासमोर गुरुवारी सकाळी ८.०० वा. पासून रास्ता रोका करण्यात आला.दि.७ जून २०१५ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यांची भरपाई आतापर्यंत मिळालेली नसून दिनांक १० मे २०१६ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे तत्काळ करुन नुकसानभरपाई मिळण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला होता. या रास्ता रोकोत तालुका अध्यक्ष कमळाकर धूम, नगराध्यक्ष संदीप वैद्य, माजी नगराध्यक्ष रियाज मनियार, जिल्हा सरचिटणीस बळवंत गावित, यशवंत भोये, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सोऐब लुलानिया, दयानंद लहारे तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यात ७ जून, २०१५ रोजी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे हाताशी आलेले आंब्याचे पीक वाया गेले होते. त्या वेळी शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या वादळामध्ये शेकडो घरेही उद्ध्वस्त झाली होती. त्या वेळी नुकसानीचे पंचनामेही झाले होते. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत नुकसानभरपाई पोहोचलीच नाही. तेव्हा दि.१४ सप्टेंबर २०१५ रोजी शासनाला जाग यावी, याकरिता पक्षाच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले होते. त्या वेळी काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली. मात्र अजूनही १ वर्ष उलटून गेले असले तरी ही उर्वरित २२४७ शेतकऱ्यांना आजपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही. याबाबत राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. त्यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी यांना उपोषणाचे लेखी पत्र दिले असता त्यांनी दि.२२ फेब्रुवारी २०१६ रोजी लेखी आश्वासन दिले होते. मात्र आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही.यावर्षीही दि.१० मे २०१६ रोजी तालुक्यात वादळी वाऱ्यांचा पाऊस पडला. यामध्ये आंबा, काजू, केळी, घरांचे व शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.