शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार तालुक्यातील जनतेला तलाठ्यांच्या मनमानीची ‘सजा’

By admin | Updated: April 10, 2017 05:17 IST

तालुक्यातील १३ तलाठी सजा आहेत. मात्र त्या संंबंधित गावांत कार्यान्वित नाहीत. त्यामुळे तालुक्यातील तलाठी

हुसेन मेमन /जव्हारतालुक्यातील १३ तलाठी सजा आहेत. मात्र त्या संंबंधित गावांत कार्यान्वित नाहीत. त्यामुळे तालुक्यातील तलाठी सजांच्या कार्यालयाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. तोपर्यंत नागरिकांना त्याची सजा भोगावी लागत आहे.जामसर, वावर, देहेरे, कोगदा, मेढा, तलासरी, विनवळ या सात तलाठी सजा साखरशेत मंडळ अधिकारी १ मध्ये मोडीत आहेत. तर जव्हार, वाळवंडा, कौलाळे, डेंगाचीमेट, न्याहाळे, पाथर्डी, या सहा तलाठी सजा जव्हार मंडळ अधिकारी २ मध्ये येत असून जव्हार तालुक्यातील १३ तलाठी सजा आहेत. मात्र या सजांचे तलाठी कार्यालयात बसतच नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील आदिवासी नागरिकांना विविध कामांसाठी त्यांची शोधाशोध करावी लागते आहे. आदिवासी नागरिक रोज विविध कामांसाठी तलाठ्यांकडे येत आहेत. यामध्ये सातबारा काढणे, नावे लावणे, जातीचा व उत्पन्न दाखला काढणे, ७ बा-याला वारस लावणे, शेतकर्यांच्या विविध नोंदी ठेवणे, दाखल्यांचा पंचनामा करणे, याकामांचा समावेश असतो. मात्र तलाठीच जागी नसल्याने नागरिकांना नाहक भुर्दंड बसतो आहे. लहान कामासाठीही तलाठी भेटत नसल्याने नागरिकांना जव्हारच्या चावडीवर धाव घ्यावी लागते. परंतु त्याही ठिकाणी तलाठी भेटत नाही. लहान-मोठ्या कामांसाठी अनेक फे-या माराव्या लागत आहेत. त्यामुळे आदिवासी नागरिकांना तलाठ्यांमुळे सजा मिळत आहे.जव्हार तालुक्यातील तलाठ्यांनी आपले कार्यालय घरीच थाटल्याने नागरिकांना तलाठ्यांच्या घराकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यानंतरही नागरिकांची कामे व्यवस्थित व वेळेत होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तलाठी कर्मचारी सजा कार्यालयात बसत नसल्याने त्यांची अवस्था दयनिय आहे. दरवाजे, खिडक्या मोडकळीस, उंदीर, घुशींचा वावर, अशा स्थिती तेथे दप्तर ठेवावे तरी कसे? असा प्रश्न आहे. सजेतील प्रत्येक तलाठ्यांने आपल्या सोयीनुसार वार ठरवून दिले आहेत. मात्र या वारालाही हे तलाठी उपस्थित राहत नाही. त्यामुळे नागरिकांना दिवसभर थांबूनही रिकाम्या हाताने परतावे लागते आहे. (वार्ताहर)