शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
3
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
4
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
5
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
6
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
7
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
8
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
9
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
10
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
11
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
12
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
13
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
14
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
15
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
16
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
17
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
18
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
19
APAAR: राज्यभरातील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे ‘अपार’ फेल
20
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?

जव्हार, मोखाड्यात धुवाँधार, रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:16 IST

तोरंगण घाटात झाडे उन्मळून संपर्क तुटला : त्र्यंबकेश्वर रस्ता बंद, आसपासच्या घरात, मोरचोंडी शाळा, अंगणवाडीत घुसले पाणी

जव्हार : संततधार पावसाने बुधवारपासून उग्ररुप धारण केले असून जव्हार मोखाड्याची दाणादाण उडवून दिली आहे. मोखाडा त्र्यंबक या नाशिककडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील मोरचोंडी येथील नदीला मोठा पूर आला या पुरात हा रस्ताच वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद झाली आहे.तसेच तोरंगण घाटात रस्त्याच्या मध्यभागी मोठ मोठी झाडे उन्मळली आहेत. तर आसपासच्या घरात पाणी घुसल्याने येथील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. यामुळे नाशिक आणि मोखाड्याचा संपर्कच तुटला आहे तर तोंरगण घाटात झाडे कोसळून रस्ता बंद झाला आहे तर खोडाळा मोखाडा रस्त्यावरील गांधी पूल मंदिराजवळ रस्त्यावर पाणी साचले. यामुळे मोखाड्यात अक्षरश: दाणादाण उडाली आहे.जव्हार मोखाडा तालुक्यात बुधवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ११३ मि.मि.पावसाची नोंद झाली आहे तर काल सकाळपासूनच पावसाने हाहा:कार माजविला आहे. मोखाडा त्र्यंबक रस्त्यावरील मोरचोंडी येथील पुलावरील रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की आसपासच्या घरात पाणी घुसले तर शाळा, अंगणवाडीमध्ये पाणी साचून त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर हा रस्ताच बंद झाल्याने बस वाहतूक कोलमडली यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.मोरचोंडी येथील महेंद्र वाघ, जयराम कडू, संपत दायमा, कुसुम वारघडे यांच्या घरात पाणी घुसून नुकसान झाले आहे तर येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीत पाणी साचले आहे. ही घटना पहाटे ६.३० वाजता घडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र यामध्ये काही घरे उद्ध्वस्त झाली आहेत. यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत कसलीही सरकारी यंत्रणा या ठिकाणी पोहचली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असून यापुढे जर याहीपेक्षा मोठी घटना घडली तर लोकांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित होत आहे. यावेळी जि.प. गटनेते प्रकाश निकम, तालुका प्रमुख अमोल पाटील, दयानंद भुसारा, रफीक मणियार, भाजपाचे नेते विठ्ठल चोथे यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे.

गारगाईच्या पुरात आमले गावाला जोडणारा साकव वाहून गेलामोखाडा : बुधवारपासून धो-धो मुसळधार कोसळणाºया पावसाने मोखाड्यात सर्वत्र दाणादाण केली आहे. अनेक रस्ते जलमय झाले आहेत. कुठे पुलावरून पाणी जात आहेत तर कुठे झाडे रस्त्यावर उमळून पडली आहेत तर ठिकठिकाणी रस्ते खचून शेती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. तालुक्याच्या मुख्यालयापासून ४५ कि.मी. अंतरावर वसलेल्या ६२ घरवस्ती व ३२२ लोकसंख्या असलेल्या आमले गाव सरकारच्या दुर्लक्षित कारभारामुळे विकासापासून दूर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमले गावाला जोडणार पूल नव्हता. परंतु या गावात पाडा समितीच्या सदस्यांच्या प्रयत्नाने मे २०१९ ला वीज वितरण कंपनीने वीज जोडणी केली. गावाला गारगाई नदीचा ३ बाजूने वळसा आहे, त्यात दोनदा नदी ओलांडून गावात जावे लागते. एका ठिकाणी पूल आहे. परंतु दुसºया ठिकाणी वनविभागाच्या विरोधामुळे पूल बिंब उभे करून अर्धवट अवस्थेत काम बाकी आहे. २०१४ पर्यंत पावसाळ्यात ग्रामस्थांना गावाबाहेर जाणे शक्य नसायचे अगदी खूप आजारी रूग्ण असेल तर ग्रामस्थ डोली बनवून ५-६ कि.मी.चे अंतर डोंगर चढून दवाखान्यापर्यंत रूग्णांना पोहच करायचे. त्या अर्धवट बिंबचा वापर करून ग्रामस्थ व आरोहन संस्थेच्या पुढाकाराने २०१४-१५ मध्ये लोखंडी साकव बांधण्यात आला होता. गेली ४-५ वर्षे त्या साकवमुळे पावसाळ्यात देखील लोकांना रहदारी करता येत होती. परंतु कालच्या झालेल्या पावसाने तो लोखंडी पूलही वाहून गेला. आमले गावचा संपर्क तुटला आहे. गावातील ४० कुटुंंब गेल्या ३-४ वर्षापासून मोगरा शेतीमधून उत्पादन घेउन कुटुंब चालवतात. सप्टेंबरपासून ते जून अखेरीसपर्यंत ५० ते ६० हजार रूपये उत्पादन मोगरी पिकातून मिळते. तसेच नदी लगत असलेली भातशेती, भाजीपाला, मोगरा शेती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहेपावसात ८ शेतकऱ्यांच्या मोगरा लागवड केलेल्या शेतातून पुराचे पाणी गेल्याने पूर्ण मोगरा शेती वाहून गेली. ते पुढीलप्रमाणे - १) राजू बार्हात, २) पांडू धवळू वारे, ३) सोमनाथ किरकिरे, ४)संजय किरकिरे, ५)विष्णु किरकिरे, ६)गौरव किरकिरे, ७) लक्ष्मण किरकिरे, ८) राजू वारे.भातशेती नुकसान- १) दिलीप लहू वारे, २) मंगळू गांगड, ३)संतोष पादीर.भातशेती नुकसान- १) दिलीप लहू वारे, २) मंगळू गांगड, ३)संतोष पादीरदाभेरी रस्त्यांची दुरावस्था, झाडे कोसळलीजव्हार : सिल्व्हासा या केंद्र शासित प्रदेशाला लागून असलेल्या जव्हार तालुक्यातील दाभरी गावाकडे जाणारा रस्ता तुटला असून, संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झाली आहे तर रुईघर बोपदरी रस्त्यात झाडे पडून रस्ता बंद झाला असून, मागील आठवड्यात एस.टी. बंद झाली होती. मात्र या भागात अनेक वाहतुकीच्या अनेक समस्या असल्याने एस.टी. दिवसातून दोन वेळा कशीबशी सुरु आहे. सिल्व्हासा या केंद्रशासित प्रदेशाला लागून असलेल्या जव्हार तालुक्यातील त्या भागाची दुर्दशा झाली असून, कायरी ते दाभेरी हा रस्ता खचला आहे. तसेच दाभरी ते रुईघर बोपदरी रस्त्यावर ठिकठिकाणी दरड कोसळून झाडे पडली आहेत. त्यामुळे नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी गैरसोय निर्माण झाली आहे.दाभेरी, बोपदरी, रुईघर या ग्रामपंचायत हद्दीत जवळपास १८ गावं-पाडे असून, ६ हजारच्या आसपास लोकसंख्या आहे. दाभेरी आरोग्य पथकावर या भागातील रु ग्णांचा भार आहे. या भागातील शिक्षणासाठी पहिली ते १२ वीपर्यंत आदिवासी विकास विभागाची आश्रमशाळा आहे. तर प्रत्येक गावं-पाड्यात जिल्हा परिषद शाळा आहेत. रस्त्यांची दुरावस्था झाल्याने एस.टी. बंद करण्यात आली होती. या भागातील गैरसोय पाहून ती सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी भागातील परिसराला भेट देवून त्या भागातील समस्या जाणून घेतल्या. या समस्यांवर लगेचच तोडगा काढण्यासाठी त्या-त्या विभागाच्या अधिकाºयांना त्या सांगून त्याबाबत तत्काळ कारवाई करण्यासभाग पाडून असे या भेटीनंतर सांगितले.

जव्हार, वावर वांगणीचा संपर्क तुटलाजव्हार : सिल्व्हासा व गुजरात या दोन राज्यांना आणि नाशिक जिल्ह्याला लागून असलेला जव्हार तालुक्यातील वावर वांगणीचा काही भाग पाण्याखाली गेला असून, वांगणी जवळील लेंडी नदीवरील पूल काही तासांपासून पाण्याखाली गेला आहे. तर वाघदरी आणि दादरकोपरा घाटात दरड कोसळून रस्ता बंद झाला असून, त्या वावर वांगणी भागातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. जव्हार तालुक्यातील वावर वांगणी ग्रामपंचायत हद्दीत १५ गावे असून, वांगणी जवळील पूल पाण्याखाली गेल्याने वावर, बेहेडगाव, चिकाडी, सरोळी, सागपाणा, पाचबुड, या गावांचा संपर्कतुटला आहे. तर वावर ते चालतवड या रस्त्यावर वाघदरी घाटात दरड कोसल्याने रस्ता बंद झाला आहे. तर दादरकोरा रस्त्यावर दरड कोसळल्याने हाही रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे या भागातील परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. वावर वांगणी भागात आरोग्य पथक, तर वावर येथे रयत संस्थेची १० वीपर्यंत शाळा आहे. वांगणी येथे इयत्ता १० वीपर्यंत आदिवासी विकासाची आश्रम शाळा आहे. या दोन शाळा असल्याने विद्यार्थी ये-जा करतात. मात्र वांगणी जवळील पूल पाण्याखाली गेल्याने त्यांचे वांधे झाले.