शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 04:24 IST

शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच पक्षांनी बैठका सुरु केल्या आहेत. शनिवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षणानुसार उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे.

- हुसेन मेमनजव्हार : शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच पक्षांनी बैठका सुरु केल्या आहेत. शनिवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षणानुसार उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. नविन नियमानुसार नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार असून, २०११ च्या जनगणनेनुसार नगर परिषदेच्या आठ प्रभागातून १७ उमेदवार मिळून एकुण १२ हजार ४१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.यंदाची निवडणूक थोडी वेगळी असून सर्वच पक्षांना नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी मतदारराजाची मिन्नतवारी करावी लागणार आहे. त्यातूनच शहरामध्ये दिवाळीच्या काळामध्ये विविध पक्षांच्या व काही उमेदवारांच्यावतीने मतदारांना मेवा-मिठाईचे वाटप करण्यात आले होते. या निवडणूकीचे आरक्षण जुलै महिन्यातच निश्चित झाल्याने काही चतुर उमेदवारांनी किरकोळ विकासकामे करुन त्या-त्या प्रभागावर आपले वर्चस्व दाखवून पक्षश्रेष्ठींवर दबाव निर्माण केला आहे.पक्षांचे नाराज कार्यकर्ते, पदाधिका-यांनी आपल्याला तिकीट मिळणार नसल्याचे संकेत मिळाल्याने दुसºया पक्षात प्रवेश केल्याच्या घटना घडल्या असून अजूनही काही उलथापालथी होण्याची शक्यता आहे. मागील निवडणूकीत राष्टÑवादीने १७ पैकी १४ उमेदवार विजयी करून एकहाती सत्ता काबीज केली होती. मात्र राजकीय सुंदोपसुदींमुळे त्यांच्या दहा नगरसेवकांनी बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला होता. त्याला पक्षाने न्यायालयात आव्हान देऊन फुटीर नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात यश मिळविले होते.कटू आठवणी लक्षातराष्टÑवादीशी द्रोह करणाºया पाच नगरसेवकांनी घरवापसी केल्यामुळे त्यांना पुनर्जीवन मिळले होते. मात्र, सत्ताधारी पक्षातील या उलथापालथीमुळे विकासकामे रखडून बकाल स्थिती निर्माण झाली होती. तसेच मागील ६ महिन्यापूर्वी दहा नगरसेवकांपैकी पाच अपात्रांच्या प्रभागामध्ये फक्त ५ महिंन्यांसाठी निवडणूका होऊन जव्हार प्रतिष्ठानचे चार तर १ अपक्ष निवडून आले. याचा त्रास झाल्याने आता मतदार चांगल्या उमेदवारांच्या प्रतिक्षेत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार