शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारचा शाही दसरा अत्यंत उत्साहात, आज रंगणार महिला मल्लांसह कुस्त्यांचे सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 05:29 IST

संपूर्ण महाराष्ट्रात दोनच ठिकाणचा दसरा प्रसिद्ध आहे. त्यातला एक कोल्हापूरचा आणि दुसरा जव्हारचा. संस्थानकाळाची परंपरा लाभलेला हा दसरा उत्सव आज मोठ्या जल्लोषात नगर परिषद व उत्सव समितीच्या संयुक्त विद्यामाने थाटात संपन्न करण्यात आला.

- हुसेन मेमन।जव्हार : संपूर्ण महाराष्ट्रात दोनच ठिकाणचा दसरा प्रसिद्ध आहे. त्यातला एक कोल्हापूरचा आणि दुसरा जव्हारचा. संस्थानकाळाची परंपरा लाभलेला हा दसरा उत्सव आज मोठ्या जल्लोषात नगर परिषद व उत्सव समितीच्या संयुक्त विद्यामाने थाटात संपन्न करण्यात आला.सायंकाळी पाच वाजता दरबारी दसºयाच्या मिरवणूकीस सुरवात झाली, यशवंतनगर मोर्चा विजय स्तंभापासून थेट हनुमान पॉइंटपर्यंत ती नेण्यात आली. जव्हारचे राजे जयबाराजे यांचे संस्थान आणि जव्हार मधील त्यांचा पूर्वीचा जुना राजवाडा कसा होता. त्याचे दर्शन घडविणारे चित्ररथ आजच्या मिरवणूकीत सादर करण्यात आले होते. या जुन्या चित्ररथावर राजे जयबा मुकणे व त्यांचे दरबारकरी त्या काळातील वेषभूषा करून आरूढ झाले होते. तसेच तारपानाच, ढोलनाच, तुरानाच, लोककला, नृत्य या मिरवणूकीत सादर करण्यात आले. तसेच राजांच्या पुतळ्याला पुष्प हार घालून मानवंदना देवून, हनुमान पॉइंट या ठिकाणी उभारलेल्या राक्षसाच्या भव्य पुतळ्याचे दहन करण्यात आले व आकाशामध्ये रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी हजारो जव्हारकरांनी याचा आनंद घेतला.यावेळी खास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार व जव्हार नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी चौक येथे शनिवारी रात्री ८.३० ला नृत्य महोत्सव व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास आदिवासी विकास तथा पालकमंत्री विष्णू सवरा हे उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमासाठी गांधी चौकाच्या मध्येच मान्यवरांची बैठक व्यवस्था करण्यात आल्यामुळे काही नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी कुस्त्यांचे जंगी सामने होणार आहेत. त्यात स्त्री मल्लांच्या लढती होतील.जव्हार मधील जुना राजवाडा या ठिकाणी कुस्त्यांचे जंगी सामने होतात. त्यासाठी पालघर, भिवंडी, नाशिक, ठाणे, इगतपुरी, घोटी, या जिल्यातील अनेक लहान-मोठे मल्ल येतात. त्यात स्त्री मल्लांचाही समावेश असतो. त्यांच्या कुस्त्या हे या स्पर्धांचे खास आकर्षण असते.

टॅग्स :Dasaraदसरा