शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारचा शाही दरबारी दसरा प्रचंड उत्साहात साजरा

By admin | Updated: October 23, 2015 00:09 IST

भूतपूर्व संस्थानाची पार्श्वभूमी असलेल्या जव्हारचा दरबारी आणि ऐतिहासिक दसरा मोठ्या धामधुमीत साजरा होतो. आजच्या जव्हारमध्ये शिल्लक राहिलेल्या संस्थानकालीन

- हुसेन मेमन,  जव्हारभूतपूर्व संस्थानाची पार्श्वभूमी असलेल्या जव्हारचा दरबारी आणि ऐतिहासिक दसरा मोठ्या धामधुमीत साजरा होतो. आजच्या जव्हारमध्ये शिल्लक राहिलेल्या संस्थानकालीन खुणांपैकी प्रामुख्याने उल्लेख करावयाचा झाला तर या दरबारी दसऱ्याचा उल्लेख नक्कीच अभिमानाने करता येईल. सुमारे ६०० वर्षे परंपरेने चालत आलेला जव्हारचा दसरा हा जव्हारकर नागरिकांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.जव्हारचा हा दरबारी, वैभवशाली दसरा संस्थाने विलीनीकरणानंतर त्या पद्धतीने साजरा होत नसला तरी नगरपालिकेमार्फत एक सांस्कृतिक परंपरा जोपासण्याच्या प्रयत्नातून दसरा गतकाळच्या स्मृती जागवत असतो. आजही तितक्याच मोठ्या उत्साहाने दसरा साजरा होतो. पूर्वी श्रीमंत राजेसाहेबांची मिरवणूक, पालखीची मिरवणूक निघत असे. आता त्याऐवजी अंबिकामातेचा चित्ररथ पालिकेतर्फे काढला जातो. जुना राजवाडा येथून हनुमान पॉइंटपर्यंत मोठी मिरवणूक निघते. हजारोंच्या संख्येने परिसरातील आदिवासी जनता येते. रात्रभर तारपा नृत्य व ढोल वादनावर बेभान होऊन नृत्याचा कार्यक्रम होतो. हा सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी लांबलांबहून लोक येत असतात. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालिकेमार्फत कुस्त्या आयोजित केल्या जातात. नाशिक, घोटी, नगर, पुणे जिल्ह्यांतील नामवंत मल्ल येत असतात. जव्हारचा दसरा हा एक सांस्कृतिक सोहळा म्हणून साजरा होत असतो. नागरिकांसमवेत मिरवणुकीने सीमोल्लंघनासाठी नगराध्यक्ष हनुमान पॉइंटवर जातात. शमीपूजन होताच तेथे सोने लुटले जाते. रावणाच्या प्रतिमेचे दहन होते.