शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जव्हारचे टिष्ट्वंकल कार्यालय केले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:35 IST

शहरातील सोनार आळी येथील तीन वाणिज्य गाळ्यांचे ट्विंकल कार्यालय मुंबईच्या आर्थिक गुन्हे विभाग कक्ष-७ यांनी शुक्रवारी सील केले आहे.

जव्हार : शहरातील सोनार आळी येथील तीन वाणिज्य गाळ्यांचे ट्विंकल कार्यालय मुंबईच्या आर्थिक गुन्हे विभाग कक्ष-७ यांनी शुक्रवारी सील केले आहे.वरीष्ठ पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे विभाग, कक्ष-७, मुबंई यांचे कडून जाहिर नोटीसी द्वारे गाळे क्र. २, ३ व ४ तळमजला, धनवर्षा कॉम्पलेक्स, सभाजी रोड, जव्हार येथील ट्विंकल ग्रुपच्या मिळतीला सिल लावण्यात आला असून, याबाबत सील केलेली मालमत्ता विशेष सत्र न्यायाधिश (एमपीआयडी), सत्र न्यायालय, मुंबई यांच्या आदेशाखेरीज कोणासही खरेदी, विक्री, हस्तांतर, गहाणखत, भाडेपट्टा, बक्षीसपत्र इत्यादी व्यवहार करण्यास मनाई कारण्यात आलेली आहे. गेल्या काही वर्षापासुन ट्विंकल ग्रुपच्या माध्यमातून विविध नावाने दाम दुप्पट योजना, फिक्स डिपॉझिट व इतर व्यवहारातून येथील गोर गरीब आदिवासी जनतेकडून कोट्यवधी रूपये गोळा करण्याचे काम करून ग्राहकांनी दिशाभूल करण्याचे काम या ग्रुपच्या माध्यमातून चालू होते. याकरीता हजारो एजन्टची नेमणूक करून त्यांना जास्त कमिशनचे आमिष दाखवून मोठ्याप्रमाणात लूट सुरू केली होती. मागील काही वर्षापासुन ग्राहकांचे मुदत संपल्यानंतरही पैसे देण्यास कंपनी टाळाटाळ करीत होती.

कोणता झेंडा घेऊ हाती?लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : पालघर पोटनिवडणुकीचे बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजायला लागले असून तुर्तासतरी सर्व महत्त्वाच्या पक्षानी स्वबळाचा नारा देत शिक्त प्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज भरले मात्र गुरुवारी बविआ, कॉंग्रेस आणि भाजपा या तिन्ही पक्षानी एकाच दिवशी अर्ज दाखल केले. यावेळी प्रत्येक तालुकानिहाय कार्यकर्ते मागविण्यात आले होते. मात्र, पक्षांचे सक्र ीय सदस्य सोडले तर जे काही सर्वच पक्षात मी तुमचाच म्हणून वावरत असलेल्या कार्यकर्त्यांची मात्र यामुळे पंचाईत झाली. यामुळे सर्वच पक्षांच्या गाड्या दारात आल्यानंतर आता ‘कोणता झेंडा घेवू हाती’ असा प्रश्न अनेकांना पडून नेत्यांना मात्र आपला कोण, परका कोण याची माहीती लागली.अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपा, बविआ आणि कॉँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या इराद्याने प्रत्येक तालुक्यातील झेडपी गटनिहाय कार्यकर्ते मागविण्याची तजवीज केली होती. यासाठी आवश्यक सर्व व्यवस्था केली गेल्याचे चित्र होते. मात्र, मूठभर कार्यकर्ते सोडले तर सर्वसामान्य मतदार या भानगडीत पडत नाही. यामुळे कसलीतरी प्रभोलने देऊन गर्दी जमविण्याची पक्षांची धडपड असते याला पक्ष कोणताही असो हमखास गाडीत बसून जाणाºया कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद मिळत असतो. याशिवाय चला फुकटची गाडी आहे येवू फिरून म्हणणारेही मोठ्याप्रमाणावर असतात. मात्र गुरुवारी सर्वच तालुक्यात तिन्ही पक्षाची वाहने फिरत असल्याने अशा संधी साधु कार्यकर्त्यांची मात्र अडचण झाली. याप्रसंगी अनेकांचा सर्वपक्षीय बुरखा फाटला.