शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

जनता दल सेक्युलर गावितांच्या पाठीशी

By admin | Updated: February 7, 2016 00:44 IST

पालघर विधानसभेची निवडणूक पालघरच्या विकासासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावणार असून लोकशाही मानणारा व सर्वधर्मसमभाव जपणारा पक्ष असलेल्या कांग्रेसच्या राजेंद्र

पालघर : पालघर विधानसभेची निवडणूक पालघरच्या विकासासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावणार असून लोकशाही मानणारा व सर्वधर्मसमभाव जपणारा पक्ष असलेल्या कांग्रेसच्या राजेंद्र गावित यांना जनता दलाने (सेक्युलर) पाठिंबा जाहीर केला आहे.पालघरच्या निवडणुकीत एका बाजूला बविआ तर दूसऱ्या बाजूला समाजामध्ये दुफळी निर्माण करणारी युती आहे. या पार्श्वभूमीवर जनतादलाने लोकशाही मानणारा सर्व समभाव जपणारा पक्ष म्हणून गविताना पाठिंबा जाहीर करून त्यांनाच मतदान करावे, असे मतदारांना आवाहन करणारे पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यावर अध्यक्ष अमृत अधिकारी, माजी आमदार नवनीतभाई शाहा, डॉ. दादा परुळेकर, सुभाष मोरे, प्रकाश लवेकर, विजय राउत, हरेश्वर निजप, मोहन कामत, विद्याधर ठाकुर, इ.नी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.राजेंद्र गावित हे २००९ च्या निवडणुकीत पालघर विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले व त्यानी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये आदिवासी विकास, कामगार, फलोत्पादन आणि विशेष लाभ क्षेत्र या विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात त्यानी पालघर परिसरातील शेतकरी, मच्छीमार, कामगार, व्यापारी, छोटे उद्योग धंदेवाले, महिला, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले. त्यांचा लोकसंपर्कही दंडगा आहे. त्यामुळे येथील सर्व सामान्य मतदाराला आपला खरा खुरा लोकांचा प्रतिनिधि मिळाल्याचे समाधान मिळाले होते. पालघर विधान सभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाची कामे त्यांच्या आमदार व राज्यमंत्री कार्यकाळात झाली. पालघर जिल्ह्याच्या विभाजनाचा खूप काळ प्रलंबित पडलेला प्रश्न त्यानी मोठ्या हिमतीने सोडवला. पालघरच्या विकासाचा मार्ग मोकळा करुन दिला.(वार्ताहर)